जपानच्या बेडकामध्ये सापडला कर्करोग विरोधी जीवाणू, एक डोसही पुरेसा

जपानी शास्त्रज्ञांना एक अद्भुत शोध लागला आहे. जपानी ‘ट्री फ्रॉग’ नावाच्या बेडकाच्या आतड्यांमध्ये असलेला जीवाणू कर्करोगावर प्रभावी ठरला आहे. उंदरांवर केलेल्या परीक्षणात कोणतेही गंभीर दुष्परिणाम न होता एका डोसमध्ये त्यांचा ट्युमर नष्ट झाला आहे. हे संशोधन ‘Gut Microbes’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले असून ते संशोधन भविष्यात कर्करोगाच्या रुग्णांसाठी आशेचा किरण असणार आहे.
बेडूक, पाल, उभयचर आणि सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये कर्करोगाचे प्रमाण फार कमी असते. त्यामुळे जपान अॅडवान्स इन्स्टिट्युट अॅण्ड टेक्नोलॉजीच्या वैज्ञानिकांनी या प्राण्यांच्या आतड्यातील जीवाणूचा उंदरांवर काय परिणाम होतो याची पाहणी केली. त्यांनी बेडूक, सरडा आणि पाल यातून जवळपास 45 जीवाणू निवडले. यापैकी 9 प्राण्यामध्ये कर्करोगाशी लढण्याची चांगली क्षमता दिसली. यामध्ये सगळ्यात प्रभावी जपानी ‘ट्री फ्रॉग’ ठरला. या बेडकाचा Ewingella americana हा जीवाणू प्रभावी ठरला. याच्या केवळ एका डोसने उंदराचा ट्युमर पूर्णपणे बरा झाला. त्यानंतर 30 दिवसानंतर पुन्हा कर्करोगाचे सेल टाकण्यात आले. तरी पुढच्या एक महिन्यात ट्युमर झाले नाहीत. हा जीवाणू थेट ट्युमरवर हल्ला करतो. शरीरातील रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतो. टीसेल, बी सेल आणि न्यूट्रोफिल्सला सक्रिय करतात. ट्युमरमध्ये ऑक्सिजन कमी असतो. तिथे केमोथेरपी औषधं कमी प्रभावी ठरतात. मात्र, हे जीवाणू अशा कमी ऑक्सिजन सारख्या ठिकाणीही चांगले काम करत आहेत.
सध्या हे संशोधन केवळ उंदरांवर झाले आहे. माणसांवर हे काम करेल की नाही? त्यासाठी भरपूर संशोधन बाकी आहे. वैज्ञानिक आता हे अन्य प्रकारच्या कर्करोगावर काय परिणाम करतात त्याची चाचणी करत आहेत. दुसऱ्या औषधांसोबत मिसळून त्याचा काय परिणाम होतो ते पाहू इच्छित आहेत आणि आणखी प्रभावी पद्धतीने औषधे पोहोचण्याचा मार्ग शोधत आहेत. सुरक्षितता ही एक मोठी चिंता आहे, कारण ‘इविंगेला अमेरिकाना’ माणसांमध्ये संक्रमण निर्माण करू शकतो. म्हणून, वैद्यकिय चाचण्या अत्यंत सावधगिरीने केल्या पाहिजेत. सध्या मूत्राशयाच्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी बॅक्टेरिया थेरपीचा वापर केला जात आहे. बेडकांसारखे जीव भविष्यात नवीन कर्करोगावर प्रभावी औषधे देऊ शकतात. वैज्ञानिकांच्या मते, निसर्गाच्या जैवविविधतेमध्ये अनेक औषधे लपलेली आहेत. नवीन औषधे शोधत राहण्यासाठी जैवविविधतेचे जतन केले पाहिजे.

Comments are closed.