पंजाबच्या सीमेवर तैनात केली जाणारी ड्रोनविरोधी प्रणाली
वृत्तसंस्था/ अमृतसर
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान विरोधात प्रत्येक आघाडीवर कारवाई केली जात आहे. पंजाबमध्ये पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेच्या मार्गे शस्त्रास्त्रs आणि अमली पदार्थांची तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. आता ही तस्करी रोखण्यासाठी पंजाब सरकारने अँटी-ड्रोन सिस्टीम तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.
हे तंत्रज्ञान सुरक्षा यंत्रणा आणि पोलिसांना पाकिस्तानी ड्रोनच्या घुसखोरीचा त्वरित थांगपत्ता लावणे आणि त्याला नष्ट करण्यास सक्षम करणार असल्याचे पंजाबच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून जारी वक्तव्यात म्हटले गेले आहे. पाकिस्तानकडून होत असलेल्या ड्रोनद्वारे शस्त्रास्त्रs आणि अमली पदार्थांच्या तस्करीचे कट अँटी-ड्रोन यंत्रणेने हाणून पाडले जाणार आहेत. आता कुठल्याही घुसखोरीच्या स्थितीत त्वरित कारवाई करत ड्रोन पाडविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले.
मागील काही वर्षांमध्ये पंजाबमध्ये पाकिस्तानमधून ड्रोनद्वारे शस्त्रास्त्रs, रोख रक्कम आणि अमली पदार्थ पाठविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अनेकदा हे ड्रोन पाडविण्यास यश आले आहे, परंतु ड्रोनद्वारे होणाऱ्या तस्करीचा धोका ओळखत पंजाब सरकारने आता मोठे पाऊल उचलले आहे. ही प्रणाली रडार, सेंसर, जॅमिंग आणि शूट-डाउन तंत्रज्ञानाने युक्त असणार आहे. यामुळे सुरक्षा दलांना केवळ ड्रोनचे लोकेशन समजणार नसून तो नष्ट करण्याची क्षमताही उपलब्ध होणार आहे
Comments are closed.