राजस्थानचा अनुज अग्निहोत्री यूपीएससीमध्ये अव्वल
958 विद्यार्थी ठरले पात्र : टॉप 10 मध्ये 3 युवतींचा समावेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
युपीएसीने सिव्हिल सर्व्हिस एक्झाम 2025 चा अंतिम निकाल जारी केला आहे. राजस्थानच्या चित्तौडगडच्या रावतभाटा येथील अनुज अग्निहोत्रीने या परीक्षेत देशात पहिला क्रमांक मिळविला आहे. तर दुसऱ्या स्थानावर तामिळनाडूची राजेश्वरी सुवे राहिली आहे. चंदीगड येथील एकांश ढुलने युपीएससी परीक्षेत तिसरा क्रमांक पटकाविला आहे. तर 958 उमेदवार विविध सेवांसाठी पात्र ठरले आहेत.
अनुजने यापूर्वीही 2 वेळा युपीएससी परीक्षेत यश मिळविले होते. युपीएससी 2023 मध्ये पहिल्या प्रयत्नातच त्याला दिल्लीत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पदावर नियुक्ती मिळाली होती.
निवड झालेल्या उमेदवारांची भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय विदेश सेवा (आयएफएस), भारतीय पोलीस सेवा (आयएफएस) आणि केंद्रीय सेवांमध्ये (ग्रूप ए आणि बी) नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली आहे.
कोणत्या श्रेणीसाठी किती उमेदवारांची निवड
श्रेणी निवडलेले उमेदवार
सामान्य 317
EWS 104
ओबीसी 306
sc 158
एसटी 73
एकूण 958
348 उमेदवारांची निवड सध्या अस्थायी ठेवण्यात आली आहे. या उमेदवारांचे दस्तऐवज आणि अन्य आवश्यक प्रक्रियांच्या पडताळणीनंतरच त्यांच्या निवडीला अंतिम रुप दिले जाणार आहे. तर दोन उमेदवारांच निकाल सध्या रोखण्यात आला असल्याचे आयोगाकडून सांगण्यात आले. परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांचा गुण निकाल घोषित झाल्याच्या तारखेपासून 15 दिवसांच्या आत युपीएससीच्या वेबसाइटवर जारी केले जाणार आहेत.
Comments are closed.