आयटीची नोकरी सोडून दिग्दर्शक बनली; पदार्पणात पुरस्कार, अनुपर्णा रॉयने गाजवला व्हेनिस चित्रपट महोत्सव

चित्रपट निर्माती व दिग्दर्शिका अनुपर्णा रॉय हिने पदार्पणातच व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गाजवला. महोत्सवात ‘साँग्स ऑफ फॉरगॉटन ट्रीज’ या चित्रपटासाठी अनुपर्णा रॉय हिला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. आयटी क्षेत्रातील नोकरी सोडून फिल्म इंडस्ट्रीत येण्याचा धाडसी निर्णय अनुपर्णाने घेतला. त्यासाठी कुटुंबातील सदस्यांची नाराजीही झेलली.
अनुपर्णाच्या प्रवासाविषयी तिचे वडील ब्रह्मानंद रॉय म्हणाले, ‘‘तिच्या शालेय जीवनात आम्हाला तिच्यामधील चित्रपटांबद्दल फार प्रेम आणि आवड दिसली नव्हती. ती खूप अभ्यासू होती, पण जेव्हा ती आयटी क्षेत्रात काम करू लागली, तेव्हा तिच्यामध्ये चित्रपटांबाबत आवड निर्माण झाली. तिला स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची होती.
अनुपर्णाने अखेर नोकरी सोडून चित्रपट दिग्दर्शनात काम करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे तिच्या कुटुंबातील सदस्य नाराज झाले. 2021 मध्ये ती पूर्णवेळ चित्रपट निर्मितीत काम करण्यासाठी मुंबईत आली. तेव्हा आम्हाला वाटले की, हे जोखमीचे काम आहे. कारण तिला चित्रपट निर्मितीचा कोणताही अनुभव नव्हता, परंतु तिच्यामधील कामाप्रतिचे समर्पण पाहिले. तिचा उत्साह आणि चिकाटी यामुळे हळूहळू आम्हाला तिच्या क्षमतेबद्दल विश्वास वाटू लागला.’’
‘ते’ वादग्रस्त वक्तव्य आणि ट्रोलिंग
अनुपर्णा रॉय यांनी पुरस्कार स्वीकारताना पॅलेस्टाईनमधील लहान मुलांच्या अधिकारांचा मुद्दा मांडला. यावरुन सध्या तिला ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागत आहे.
Comments are closed.