वय 53, एका मुलीचा बाप, 20 वर्षांहून लहान मुलीला करतोय डेट; तिसरं लग्न करणार असल्याची चर्चा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

प्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप नेहमीच आपल्या हटके चित्रपटांमुळे आणि परखड मतांमुळे नेहमी चर्चेत असतात. मात्र इंडस्ट्रीच सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा रंगताना दिसते. अनुराग कश्यप स्वतःपेक्षा तब्बल 20 वर्षांनी लहान असलेल्या शुभ्रा शेट्टीला डेट करत असल्याचा दावा केला जात आहे. या दोघांच्या वयातील अंतरामुळे त्यांना अनेकदा सोशल मीडियावर ट्रॉलिंगचा सामना करावा लागला आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनुराग कश्यप आणि शुभ्रा शेट्टीने त्यांच्या या नात्यावर आणि वयातील मोठ्या अंतरावर उघडपणे भाष्य केले. वयातील 20 वर्षांच्या अंतरामुळे आपल्याला लोकांच्या रोषाचा आणि ‘एज शेमिंग’चा सामना कसा करावा लागला, याबद्दल त्यांनी प्रतिक्रिया दिली. अनुराग यांनी सांगितले की, सुरुवातीला ते स्वतः या वयाच्या अंतराबाबत खूप ‘सेल्फ कॉन्शियस’ झाले होते आणि त्यामुळे त्यांनी एकदा शुभ्राला स्वतःपासून दूर करण्याचाही प्रयत्न केला होता, असे त्यांनी सांगितले.

आपल्या नात्याच्या सुरुवातीच्या आठवणी सांगताना शुभ्रा शेट्टीने मुलाखतीत म्हटले की,सुरुवातीला त्यांनी आपले नाते मीडियापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला होता. तसेच, तिच्या पालकांच्या प्रतिक्रियेबाबत बोलताना शुभ्राने सांगितले की, जर ती स्वतः पालक असती आणि तिची 20 वर्षांची मुलगी दोनदा घटस्फोट झालेल्या आणि एका मुलीच्या वडिलांना डेट करत असती, तर तिनेही संताप व्यक्त केला असता. मात्र तिच्या आई-वडिलांनी ही संपूर्ण परिस्थिती अतिशय समजूतदारपणे हाताळली, असेही तिने स्पष्ट केले.

अनुराग कश्यपचे यापूर्वी दोनदा कायदेशीर घटस्फोट झाले आहेत. त्यांची पहिली पत्नी आरती बजाज असून त्यांना आलिया कश्यप नावाची एक मुलगी देखील आहे, तर त्यांची दुसरी पत्नी अभिनेत्री कल्कि केंकला होती. दोन अयशस्वी विवाह आणि एक अपत्य असतानाही, अनुराग मागील बऱ्याच काळापासून 30 वर्षीय शुभ्रा शेट्टीसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. हे दोघे सध्या बंगळुरू येथे एकत्र राहत असून त्यांच्या या नात्याला जवळपास 11 वर्षे पूर्ण झाली आहेत.

Comments are closed.