Anurag Kashyap- अखेर अनुराग कश्यपने मुंबई सोडली, बाॅलिवूडला ‘टाॅक्सिक’ म्हणत चित्रपटसृष्टीला केला रामराम

गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप हे मुंबई सोडणार असल्याच्या बातम्या येत होत्या. अखेर त्यांनी नुकत्याच इंग्रजी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुंबई सोडली असल्याचे अखेर त्यांनी जाहीर केले. या मुलाखतीमध्ये ते म्हणाले, ‘मी मुंबई सोडली असून, मला फिल्मी लोकांपासून दूर राहायचे आहे. हा उद्योग सध्याच्या घडीला खूप टाॅक्सिक झालेला आहे. तसेच प्रत्येकाला इथे 500 किंवा 800 कोटींचाच चित्रपट बनवायचा आहे.’
सध्याच्या घडीला चित्रपट बनवण्यासाठी जे क्रिएटीव्ह वातावरण हवे आहे तेच नाहीसे झालेले आहे. त्यामुळेच हे कारण पुढे करत त्यांनी मुंबई सोडून बंगळुरुला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित मुद्द्यावर अधिक बोलताना कश्यप म्हणाले की, सध्याच्या घडीला केवळ मीच मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला नाही तर, मुख्य प्रवाहातील अनेकजण बाॅलीवूड सोडून जाण्याच्या विचारात आहेत. बाॅलीवूडमध्ये केवळ एकमेकांचे पाय कसे खेचता येतील यावरच सध्याच्या घडीला लक्ष केंद्रीत आहे. सध्याच्या घडीला दक्षिणेकडील इंडस्ट्रीमध्ये अनुराग कश्यप कार्यरत आहेत. सध्याच्या घडीला ‘महाराजा’ आणि ‘रायफल क्लब’ या सिनेमांमध्ये त्यांनी काम केले आहे.
अनुराग कश्यप यांनी नुकतेच लग्न केले असून, लग्नानंतर लगेच त्यांनी मुंबई आणि बाॅलिवूडपासून दूर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. सध्याच्या घडीला कश्यप त्यांनी सादर केलेल्या ‘फुटेज’ या मल्याळम चित्रपटाच्या हिंदी वर्जनच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. हा चित्रपट येत्या 7 मार्चला रोजी प्रदर्शित होणार आहे. अनुराग कश्यपने कायमच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये नवनवीन प्रयोग करुन पाहिले आहेत. त्याने कायम बाॅलिवूडमधील अनेक घडामोडींवर सडेतोड मतप्रदर्शनही व्यक्त केले आहे.
Comments are closed.