अनुष्का शर्माकडुन भारतीय खेळाडूंचं खास अभिनंदन, कर्णधार रोहितसह, हार्दिक पांड्याला दिल्या शुभेच्छा

भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर उत्साह साजरा केल्याचे व्हिडिओ समोर येत आहेत. न्यूझीलंड संघाला अंतिम सामन्यात पराभूत केल्यानंतर भारतीय खेळाडू सोबत त्यांच्या परिवारातील सदस्य मैदानात आले होते. त्यादरम्यान विराट कोहली पत्नी अनुष्का शर्माला मैदानात घेऊन आला. तेव्हा हार्दिक पांड्या तिथे आला आणि त्याने अनुष्का शर्माला आनंदाने मिठी मारली.

चॅम्पियन्स ट्रॉफी अंतिम सामन्यात न्युझीलंड संघाने भारताला 252 धावांच आव्हान दिलं होतं. धावांचा पाठलाग करताना 6 चेंडू शिल्लक असताना भारतीय संघाने सामना जिंकला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचा किताब जिंकलेला आहे. संघ विजयी झाल्यानंतर मैदानात खेळाडूंनी परिवारासोबत आनंद साजरा केला. सर्व खूप आनंदी होते आणि एकमेकांना उत्साहाने भेटत होते.

आनंद साजरा करताना विराट कोहली आणि अनुष्का शर्मा बाउंड्री लाईन जवळ उभे राहून बोलत होते. तेव्हा खांद्यावर तिरंगा ओढून हार्दिक पांड्या तेथून जात होता. त्याने अनुष्का शर्माला पाहिले आणि त्यानंतर तो तिथे आला. त्याने अनुष्का शर्माला मिठी मारली तेव्हा अनुष्काने त्याला सामना जिंकल्याबद्दल अभिनंदन केले.

यानंतर अनुष्काने भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मालाही मिठी मारून आनंदाने सामना जिंकल्याच्या शुभेच्छा दिल्या. रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात 76 धावा केल्या होत्या. यासाठी त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. रोहित दुसरा भारतीय खेळाडू ठरला ज्याने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये हा सन्मान पटकावला.

रोहित आणि गिलने चांगली सुरुवात केल्यानंतर 3 विकेट्स पडल्या, त्यामुळे टीम इंडियावर थोडासा दबाव आला होता. विराट कोहली 1 धावेवर बाद झाला. यानंतर श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल या दोघांमध्ये 61 धावांची भागीदारी झाली आणि संघ सावरला. श्रेयसने 48 धावांची महत्त्वपूर्ण पारी खेळली. अक्षरने 29 धावा केल्या .

यानंतर के एल राहुलने 34 धावांची नाबाद पारी खेळली. हार्दिक पांड्याने शेवट 18 चेंडूत 18 धावा करून विजय सोपा करून दिला. त्यानंतर भारतीय संघाने 4 विकेट्सने हा सामना जिंकून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर भारताचे नाव कोरले.

हेही वाचा

मोठी बातमी: चॅम्पियन्स ट्रॉफीची खुली बस परेड रद्द, खेळाडू स्वतंत्रपणे घरी जाणार!

यजमान पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून भारतीय संघ ठरला चॅम्पियन! जाणून घ्या अविस्मरणीय क्षण

यजमान पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून भारतीय संघ ठरला चॅम्पियन! जाणून घ्या अविस्मरणीय क्षण

Comments are closed.