सेम टू सेम अनुष्का शर्मासारखी दिसतेय ‘ती’ पाकिस्तानी तरुणी; Video पाहून विराटचे फॅन्स हैराण
पाकिस्तानी मुलगी अनुष्का शर्मासारखी दिसते: बॉलिवूडची (Bollywood News) चुलबुली अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) सध्या कॅमेऱ्यापासून दूर असली, तरीसुद्धा तिचं फॅनफॉलोविंग काही कमी झालेलं नाही. अनुष्का शर्मा आणि तिचा पती दिग्गज क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) या ना, त्या कारणानं नेहमीच चर्चेत असतात. सिनेमापासून दूर असलेली अनुष्का शर्मा पती विराट कोहलीची मॅच पाहताना स्टेडियममध्ये दिसते, नाहीतर विराटसोबतच प्रेमानंद महाराजांच्या दरबारात (Anushka Sharma Virat Kohli At Premanand Maharaj Ashram) दिसते. पण, अजूनही चाहत्यांनी आशा सोडलेली नाही. चाहते अनुष्काच्या फिल्मची आतुरतेनं वाट पाहत आहेत. पण, तुम्हाला एक गोष्ट माहितीय का? अनुष्का सारखी सेम टू सेम दिसणारी एक तरुणी सध्या व्हायरल होतेय. आश्चर्याची बाब म्हणजे, ही तरुणी भारतातली नाहीतर पाकिस्तानची आहे. तिला पाहून काही वेळासाठी तुम्हीही विचारात पडाल की, अरे ही खरी अनुष्का तर नाही?
सोशल मीडियावर अनेक बॉलिवूड स्टार्सच्या सेम टू सेम दिसणाऱ्या व्यक्तींची गर्दी आहे आणि आता या अनुष्का शर्माचंही नाव जोडलं गेलं आहे. ही हुबेहुब अनुष्कासारखी दिसणारी मुलगी खूपच सुंदर दिसतेय. अनुष्कासारख्या दिसणाऱ्या तरुणीला पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
सेम टू सेम अनुष्का शर्मासारखी दिसतेय ‘ही’ पाकिस्तानी तरुणी (Pakistani Girl Look Like Anushka Sharma)
अनुष्का शर्मासारख्या दिसणाऱ्या पाकिस्तानी मुलीचं नाव अनिशा तसनीम आहे. अनुष्का शर्मासारखी दिसणारी ही मुलगी अनेक पाकिस्तानी कलाकारांसोबत दिसते. या व्हिडीओमध्ये ती खळखळून हसताना दिसतेय आणि अगदी अनुष्कासारखी दिसते. अनुष्का शर्मासारखी दिसणारी ही मुलगी पाहिल्यानंतर सारेच अवाक् झालेत. तिला पाहताच काही वेळासाठी सारेच थक्क होतात. काही सेकंदांसाठी मनाचा गोंधळ उडतो.
अनुष्का शर्मासारख्या दिसणाऱ्या पाकिस्तानी तरुणीचा व्हिडीओ पाहून युजर्स भलतेच हैराण झाले आहेत. काहींनी थक्क होऊन कमेंट्स केल्या आहेत. तर, काहींनी अत्यंत निराशाजनक कमेंट केल्या आहेत. दरम्यान, अनेकांनी अनिशाला ‘क्युट अनुष्का शर्मा’ असं म्हटलं आहे. अनुष्कासारख्या दिसणाऱ्या मुलीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. 17 हजारहून अधिक लोकांनी अनुष्का शर्माचा हा व्हिडीओ लाईक केला आहे. तर, तब्बल 4 लाखांहून अधिक व्यूज मिळाले आहेत.
अनुष्का सारख्या दिसणाऱ्या तरुणीच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांचं म्हणणं काय?
अनुष्का शर्मासारखी दिसणारी ही पाकिस्तानी तरुणी पाहिल्यानंतर एका युजरनं लिहिलंय की, “मी माझ्या आयुष्यात कधीही एवढी क्युट मुलगी पाहिलेली नाही…” दुसऱ् एका युजरनं लिहिलंय की, “आलिया अनुष्का शर्मा…” आणखी एका युजरनं लिहिलंय की, “अनुष्का शर्मा, रियल आयडीवरुन ये प्लीज…” तर, एक युजर लिहितोय की, “ती वहिनीपेक्षाही क्युट आहे…” पण असे अनेक युजर्स आहेत, ज्यांनी हा व्हिडीओ कमेंट सेक्शनमध्ये शेअर केला आहे, ज्यामध्ये अनुष्का शर्माच्या नावासोबत लाल हृदयाचा इमोजी जोडला आहे. दरम्यान, अनुष्का शर्मा 2018 च्या ‘झिरो’ चित्रपटात दिसली होती. त्यानंतर ती कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. दरम्यान, तिनं स्वतःच्या प्रॉडक्शन हाऊसद्वारे काही चित्रपटांची निर्मिती केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
आणखी वाचा
Comments are closed.