अनुष्कानं विराट कोहलीकडे दुर्लक्ष केलं? Viral व्हिडीओनंतर नेटकऱ्यांचा कमेंट्सचा पाऊस

अनुष्का शर्मा विराट कोहली: अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि विराट कोहलीचा (Virat Kohli) एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media Viral) व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अभिनेत्री गाडीतून खाली उतरताना दिसतेय. त्यावेळी विराट तिच्यासाठी स्वतःचा हात पुढे करतो, पण अनुष्का विराटला इग्नोर करते, त्याची जराही मदत न घेताच गाडीतून खाली उतरते. दोघेही रेस्टॉरंटमध्ये जातात. हा व्हिडीओ बंगळुरूचा आहे, असं सांगितलं जातंय.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच, युजर्सनी विराट कोहलीला घेरलंय. विराटनं अवनीत कौरचा फोटो लाईक केल्यामुळेच असं घडतंय, असं युजर्स म्हणत आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी विराट कोहलीनं अभिनेत्री अवनीत कौरचा फोटो लाईक केल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर विराट कोहलीनं एक इन्स्टा पोस्ट करत त्यावर फीड क्लिअर करत असताना इन्स्टा अल्गोरिदममुळे झालं असावं असं स्पष्टीकरण दिलेलं. या प्रकरणानंतर विराट आणि अनुष्का एकत्र स्पॉट झाल्यामुळे त्यांच्यावर साऱ्यांच्याच नजरा खिळलेल्या. त्यात अनुष्कानं विराटला इग्नोर केल्यामुळे पुन्हा एकदा विराट नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला.

हा व्हिडीओ समोर येताच युजर्सनी विराट कोहलीला चांगलंच घेरलं आहे. एका युजरनं लिहिलंय की, “असं दिसतंय की, फोटोच्या लाईकनंतर अनुष्का चांगलीच रागावली आहे.” पुढे एका युजरनं लिहिलंय की, “बिचारा विराट”, तर दुसऱ्या एका युजरनं लिहिलंय की, “अब भाभी चिकू भैया को अल्गोरिथम समजाएगी”, अजून एका युजरनं लिहिलंय की, “अवनीत कौरच्या लाईकनंतर वहिनी रागावली.” तर, कमेंट करताना अनेक युजर्सनी अनुष्काची बाजू घेतली आहे आणि म्हटलंय की, फक्त 5 सेकंदांच्या क्लिपमुळे युजर्स अनुष्काला काय-काय बोलत आहेत.


विराटनं केलेली अवनीतची पोस्ट लाईक

विराट कोहलीनं अलिकडेच अभिनेत्री अवनीत कौरची एक पोस्ट लाईक केलेली. दरम्यान, काही वेळानं विराटनं लाईक काढून टाकला. विराट कोहलीच्या लाईकचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर विराटचा अक्षरशः बाजार उठवला.

त्यानंतर विराटनं हे स्पष्ट केलं की, “फीड क्लिअर करताना असं दिसतं की, इन्स्टाग्राम अल्गोरिदमनं चुकून अॅक्टिविटी ट्रॅक केली. यामागे माझा कोणताही हेतू नव्हता. मी तुम्हाला विनंती करतो की, कृपया कोणत्याही अनावश्यक अफवा पसरवू नका. समजून घेतल्याबद्दल धन्यवाद.”

महत्त्वाच्या इतर बातम्या :

‘युद्ध म्हणजे Propaganda’, अभिनेत्री स्वरा भास्करने शेअर केला जॉर्ज ओरवेलचा कोट, म्हणाली,..’मूर्खपणाचा अंत..’

अधिक पाहा..

Comments are closed.