जेमिमा-शेफाली यांच्याशिवाय 'या' खेळाडूंवर दिल्लीचे लक्ष, पहा पूर्ण संघ
वुमेन्स प्रीमियर लीग 2026 साठी सर्व पाचही संघांनी आपापल्या तयारीला सुरुवात केली आहे. 27 नोव्हेंबरला मेगा ऑक्शन दिल्लीमध्ये होणार आहे. या ऑक्शनमध्ये सर्व खेळाडूंवर बोली लावली जाणार असून 277 खेळाडूंवर आज बोली लागणार आहे.
मेगा ऑक्शनमध्ये फॅन्सचे खास लक्ष दिल्ली कॅपिटल्सवर आहे. कारण आतापर्यंत झालेल्या तिन्ही सीझनमध्ये दिल्लीने फाइनलमध्ये प्रवेश केला असला तरी प्रत्येक वेळी पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे अजूनही या संघाला पहिल्या विजेतेपदाची प्रतीक्षा आहे.
यंदा संघाला नवीन कर्णधाराचीही गरज आहे. जाणून दिल्ली कॅपिटल्सचा संपूर्ण संघ कसा आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा संघ आगामी ऑक्शनसाठी तब्बल 5.70 कोटी रुपयांच्या मोठ्या पर्ससह उतरणार आहे. मेगा ऑक्शनमध्ये संघ काही मोठ्या खेळाडूंवर बोली लावू शकतो.
दिल्ली कॅपिटल्सची नजर अमेलिया केरवर असू शकते. अमेलिया दिल्लीसाठी एक महत्त्वाची कडी ठरू शकते. 24 वर्षीय केरने वनडेमध्ये 79 आणि टी-20 मध्ये 72 बळी घेतले आहेत.याशिवाय संघाचे लक्ष एलिसा हीलीवरही राहणार आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तसेच सायका इशाक, हरलीन देओल आणि एस. सजना ह्या खेळाडूंचाही दिल्ली कॅपिटल्सच्या संघात समावेश होऊ शकतो.
Comments are closed.