अमर सुब्रमण्य बनले अॅपलचे एआय चीफ

अॅपल कंपनीने एआय टीममध्ये मोठे बदल केले असून जॉन गियानंद्रिया यांच्या जागी अमर सुब्रमण्य यांची नियुक्ती केली असून त्यांच्याकडे एआयच्या हेडची जबाबदारी सोपवली आहे. अमर सुब्रमण्य हे अॅपल एआयचे नवीन उपाध्यक्ष असतील. ते क्रेग फेडेरिघी यांना रिपोर्ट करतील. अमर यांनी याआधी 16 वर्षे गुगलमध्ये काम केलेले आहे. त्यानंतर त्यांनी मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी जबाबदारी पार पाडली. आता अॅपलमध्ये त्यांना एआय मॉडल डेव्हलपमेंट, मशीन लर्निंग रिसर्च, एआय सेफ्टीचा संपूर्ण चार्ज मिळाला आहे. अॅपलचा प्लान आहे की, सिरीचे अपग्रेड व्हर्जन पुढील वर्षापर्यंत मार्केटमध्ये यायला हवे.

Comments are closed.