Apple Event मध्ये AirPods Pro 3 लाँच, मनोरंजनासह हॉर्ट रेट ट्रॅकिंग फीचरची सोय, किंमत किती?
Apple पल इव्हेंट 2025 लाइव्हः ॲपल ईकोसिस्टीम यूजर्ससाठी कंपनीनं आणखी एक उत्पादन लाँच केलं आहे. अमेरिकेच्या क्यूपर्टिनोमध्ये मध्ये ॲपल पार्कमध्ये आयोजित कार्यक्रमात कंपनीनं आयपफोन लाँच केला त्यासोबत एअरपॉडस प्रो 3 लाँच केलं आहे. एअरपॉडस प्रोमध्ये नवं आर्किटेक्चर वापरण्यात आलं आहे. ज्यामुळं ऑडिओ अनुभव आणखी चांगला करते. यापूर्वीच्या ॲपलच्या एअरपॉडच्या तुलनेत नव्या एअरपॉडसमध्ये सक्रिय नॉइस कॅन्सलेशन दुप्पट क्षमतेनं कार्यरत राहील. यामध्ये लाइव्ह ट्रान्सलेशनची देखील सुविधा मिलेल.
Apple AirPods Pro 3 ची वैशिष्ट्ये
ॲपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक (Tim Cook) यांनी नव्या एअरपॉड्स (AirPods) संदर्भात नव्याने डिझाईन केलेल्या लिक्विड ग्लास यूआय (Liquid Glass UI) चे महत्त्व आणि वैशिष्ट्ये सांगितली. कुक म्हणाले की ॲपलच्या प्रत्येक तंत्रज्ञानामध्ये यूजर्सची काळजी घेण्याची तत्वे अंतर्भूत आहेत.
ॲपल एअरपॉड्स हे जगातील सर्वाधिक लोकप्रिय इयरफोन्सपैकी एक आहेत. एअरपॉड्स प्रो (AirPods Pro) मध्ये एंड-टू-एंड हिअरिंग फंक्शनॅलिटी (end to end hearing functionality) उपलब्ध करून दिली गेली आहे. तसेच ॲपल सातत्याने नवनवीन तंत्रज्ञान विकसित करत असून पुढील पिढीचे एअरपॉड्स आणण्यासाठी कंपनी सातत्याने नवकल्पना करत आहे.
एअरपॉड्स प्रो 3 (AirPods Pro 3) मध्ये याआधीच्या मॉडेलच्या तुलनेत दुप्पट अॅक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन (Active Noise Cancellation) आहे आणि ते चारपट अधिक प्रभावी ठरते. यामधील ट्रान्सपेरन्सी मोड (Transparency Mode) मुळे वापरकर्त्यांना आजूबाजूचे आवाज स्पष्टपणे ऐकू येतात.
ॲपल एअरपॉड्स प्रो 3 (Apple AirPods Pro 3) आजपासून प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध झाले असून 19 सप्टेंबरपासून विक्रीसाठी बाजारात येणार आहेत. यांची किंमत 200 -249 डॉलर्स (USD 200-249) इतकी ठेवण्यात आली आहे. मात्र भारतातील किंमत (India Price) अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. यासाठी प्री बुकिंग करता येऊ शकतं.
एअरपॉडस प्रो 3 मध्ये आरोग्यविषयक एक फीचर लाँच केलं आहे. या एअरपॉडसद्वारे ऑडिओ ऐकवण्यासह हॉर्ट रेट देखील ट्रॅक केला जाणार आहे.
ॲपलनं सांगितल की एअरपॉडसमध्ये LED ऑप्टिकल सेन्सर आहेत. जे रक्त प्रवाहाच्या आधारे ह्रदयाच्या ठोक्यांवर नजर ठेवेल. मोठ्या बदलांसह ॲपलनं एअर फोनला डिझाईन केलं आहे. पहिल्या एअरपॉडसच्या तुलनेत नवे योग्यप्रकारे कानात फीट होतील. याशिवाय चार्जिंग केसमध्ये देखील बदल पाहायला मिळाले आहेत. एअरपॉडस 4 च्या प्रमाणं यामध्ये नवे टच कंट्रोल दिले गेले आहेत. यामुळं ॲपल डिव्हाइससोबत यचं पेअरिंग करणं सोप होईल.यूजर्स टॅप करुन आयफोन किंवा दुसऱ्या ॲपल उपकराशी डिव्हाइस कनेक्ट करु शकतात.
आणखी वाचा
Comments are closed.