1981 कोटी रुपयांच्या संरक्षण खरेदीसाठी मान्यता

दहशतवादविरोधी लढ्याकरता महत्त्वाचा निर्णय : सैन्याला मिळणार घातक शस्त्रास्त्र

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारत सरकारने दहशतवाद विरोधात सैन्याच्या क्षमतेला मजबूत करण्याच्या उद्देशाने मोठे पाऊल उचलत 1,981.90 कोटी रुपयांचे 13 संरक्षण करार केले आहेत. हे करार ‘आपत्कालीन खरेदी व्यवस्थे’च्या अंर्तत करण्यात आले आहेत. या करारांच्या माध्यमातून सीमापार दहशतवाद विरोधात कारवाईसाठी सैन्याच्या तयारीला मजबूत करण्यात येणार आहे.

त्वरित क्षमता विकास सुनिश्चित करात येऊ शकेल, याकरता ही खरेदीप्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यात आल्याचे संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले. या करारांच्या अंतर्गत भारतीय सैन्याला अत्याधुनिक सैन्य उपकरणे आणि तंत्रज्ञान पुरविण्यात येत आहे. यामुळे सैनिकांची सजगता, मारकक्षमता, गतिशीलता आणि सुरक्षेत उल्लेखनीय वृद्धी होणार आहे.

आपत्कालीन खरेदी व्यवस्थेच्या अंतर्गत सैन्यासाठी इंटीग्रेटेड ड्रोन डिटेक्शन आणि इंटरडिक्शन सिस्टीम (आयडीडीआयएस), लो-लेव्हर लाइटवेट रडार (एलएलएलआर), अत्यंत कमी पल्ल्याची हवाई सुरक्षा प्रणाली (व्हीएसएचओआरएडीएस), लाँचर आणि क्षेपणास्त्रs, रिमोटली पायलटेड एरियल व्हीकल (आरपीएवही), वर्टिकल टेक-ऑफ आणि लँडिंग (व्हीटीओएल) सिस्टीम समवेत लोइटरिंग म्युनिशन, विविध श्रेणींचे ड्रोन, बुलेटप्रूफ जॅकेट, बॅलेस्टिक हेल्मेट, क्विक रिअॅक्शन फायटिंग व्हीकल (क्यूआरएफव्ही), अवजड अन् मध्यम श्रेणींच्या रायफल्ससाठी नाइट साइट्स यासारखी शस्त्रास्त्रs अन् उपकरणे खरेदी करण्यात येणार आहेत.

दहशतवाद विरोधात कठोर धोरण

केंद्र सरकारने पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाचे कंबरडे मोडून काढण्यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये सैन्याच्या मोहिमात्मक तयारीला सर्वोच्च प्राथमिकता दिली असताना हे पाऊल उचलण्यात आले आहे. हे सर्व करार जलद प्रक्रियेच्या अंतर्गत पूर्ण करण्यात आले आहेत, जेणेकरून सैनिकांना कमीतकमी कालावधीत आवश्यक उपकरणे उपलब करविता येतील. एकूण 2 हजार कोटीच्या बजेटमधून 1,981.90 कोटी रुपयांची खरेदी पूर्ण करण्यात आली आहे. दहशतवादविरोधी मोहिमांकरता सैन्याची तयारी सशक्त करण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या आपत्कालीन खरेदीमुळे भारतीय सैन्याची क्षमता वाढणार असल्याचे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

स्वदेशी संरक्षण निर्मितीला प्रोत्साहन

या करारांमध्ये स्वदेशी संरक्षण निर्मितीला प्रोत्साहन देण्यावर विशेष जोर देण्यात आला आहे. भारतीय सैन्याने सोलर डिफेन्स अँड एअरोस्पेस लिमिटेडला 450 नागास्त्र-1 आर लॉइटरिंग म्युनिशनच्या खरेदीसाठी ऑर्डर दिली आहे. ही प्रणाली पूर्णपणे पुनर्वापर योग्य लाँचर सिस्टीमसोबत असून यात 360 डिग्री गिम्बल कॅमेरा,  रात्रीच्या मोहिमांसाठी थर्मल कॅमेरा आणि उच्च अचूकतायुक्त लक्ष्यीकरण सिस्टीम सामील आहे. या प्रणालीत 80 टक्क्यांहून अधिक स्वदेशी सामग्री असून याचे लडाख आणि उत्तरप्रदेशच्या बबीननजीक परीक्षण करण्यात आल्याचे संरक्षण मंत्रालयाकडुन सांगण्यात आले.

 

Comments are closed.