प्रेम पूजा आहे, तर तू माझा कृष्ण आणि मी तुझी राधा….अपूर्वा नेमळेकरचं नवऱ्यासोबतचं रोमॅण्टिक फोटोशूट व्हायरल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रात्रीस खेळ चाले या मालिकेतून घराघरात पोहोचलेली शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरचं नुकतंच लग्न झालं. आता तिने आपल्या जोडीदारासोबतचे खास फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे, घागरा चोली, हातात कमळ, केसांची सैलसर बांधलेली वेणी हे लूक पाहून चाहते फिदा झाले आहेत.

अपूर्वा नेमळेकरने सोशल मीडियावर अगर प्रेम पूजा है, तो तुम मेरे कृष्ण… और मैं तुम्हारी राधा। अशी या फोटोंना फोटोओळ दिली आहे.

आपल्या जोडीदारासोबतचे काही खास फोटो शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अपूर्वाचा ब्लाऊजही सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

या फोटोंमध्ये तिने घागरा घातला असून या घेरदार घागऱ्यावर लाल रंगाचा डिझायनर ब्लाऊज परिधान केला आहे.

तर तनुज गोवळकरने मरून रंगाचा नक्षीदार कुर्ता आणि क्रीम रंगाचे धोतर नेसून एक पारंपरिक लूक कॅरी केला आहे.

चाहत्यांनी त्यांच्या फोटोंना लाईक्स करुन भरपूर  कमेण्ट्स केल्या आहेत.

Comments are closed.