काश्मीरच्या वेगवान गोलंदाजाचा मोठा पराक्रम! डबल हॅट्ट्रिक घेत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा

सुधारित करा जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबीने दुलीप ट्रॉफी 2025 च्या उपांत्यपूर्व फेरीत नॉर्थ झोनकडून खेळताना ईस्ट झोनविरुद्ध दुहेरी हॅट्ट्रिक घेऊन इतिहास रचला आहे. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे ईस्ट झोनचा संघ 230 धावांत गारद झाला. (Duleep Trophy Quarter-Final)

आकिबने 53 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर पहिली विकेट घेतली. त्यानंतर 52.5 चेंडूंवर दुसरी आणि षटकाच्या शेवटच्या चेंडूवर तिसरी विकेट घेतली. अशा प्रकारे त्याने आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली. त्यानंतर, 55 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्याने आणखी एक विकेट घेत दुहेरी हॅट्ट्रिकचा पराक्रम केला. क्रिकेटमध्ये, जेव्हा एखादा गोलंदाज सलग चार चेंडूंवर चार विकेट्स घेतो, तेव्हा त्याला दुहेरी हॅट्ट्रिक म्हणतात. (Aaqib Nabi Double Hat-trick)

या सामन्यात आकिबने दुहेरी हॅट्ट्रिकसह 5 विकेट्स घेतल्या. त्याने 10.1 षटकांत 28 धावा देत 5 फलंदाजांना बाद केले. त्याच्या या शानदार कामगिरीमुळे ईस्ट झोनचा डाव 230 धावात संपुष्टात आला.

नॉर्थ झोनने त्यांच्या पहिल्या डावात 93.2 षटकांत 405 धावा केल्या होत्या. या धावसंख्येच्या प्रत्युत्तरात ईस्ट झोन दुसऱ्या दिवसाच्या खेळातच 230 धावांवर सर्वबाद झाला. नॉर्थ झोनकडून कन्हैया वधावन आणि आयुष बडोनी यांनी अनुक्रमे 76 आणि 63 धावा केल्या. ईस्ट झोनकडून विराट सिंगने सर्वाधिक 69 धावांचे योगदान दिले. दुसऱ्या दिवसअखेर ईस्ट झोन अजूनही 175 धावांनी पिछाडीवर आहे. (North Zone vs East Zone)

Comments are closed.