इस्रायलच्या सत्तेची चावी अरब पक्षांच्या हाती, नेतान्याहू यांचा व्होटचोरीचा आरोप
इराण, गाझा आणि लेबनॉनविरुद्धच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलमध्ये झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत विद्यमान पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना मोठा दणका बसला आहे. नेतान्याहू यांच्या लिपूड पक्षाच्या नेतृत्वाखालील आघाडी बहुमतापासून दूर राहिली असून प्रमुख विरोधी पक्षालाही स्पष्ट कौल मिळालेला नाही. त्यामुळे इस्रायलची संसद त्रिशंपू झाली असून 19 जागा जिंकणाऱया अरब पक्षांच्या हाती सत्तेच्या चाव्या गेल्या आहेत. त्यामुळे संतापलेल्या नेतान्याहू यांनी अरब पक्षांवर मतचोरीचा आरोप केला आहे.
इस्रायलमध्ये 27 ऑक्टोबर रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मतपत्रिकेद्वारे मतदान झाले. दोन दिवसांनी मतमोजणी पूर्ण झाली असून केवळ दुहेरी लिफाफ्यांमधील मतांची मोजणी शिल्लक आहे. आतापर्यंतच्या मतमोजणीत लिकूडच्या नेतृत्वाखालील आघाडीला 53 जागा मिळाल्या आहेत. तर विरोधी पक्षनेते आयसेनकोट यांच्या विरोधी आघाडीला 48 तर अरब पक्षांना 19 जागा मिळाल्या आहेत. सत्ता स्थापनेसाठी 61 जागांची गरज असून कोणत्याही पक्षाला हा आकडा गाठता आलेला नाही. अरब पक्ष ज्या आघाडीच्या बाजूने जातील त्या पक्षाची सत्ता येईल, असे सध्याचे चित्र आहे.
सत्तेपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता दिसताच पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अरब पक्षांवर मतचोरी व बोगस मतदानाचा आरोप केला. कतार, तुकाa व इतर अरब देशांनी निवडणुकीत हस्तक्षेप केला. या देशांनी इस्रायल आणि वेस्ट बँक येथे पैसे पाठविल्याचा दावाही नेतान्याहू यांनी केला. इस्रायलने ‘शीन बेत’ या तपास यंत्रणेला परकीय हस्तक्षेपाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
Comments are closed.