‘मेड-इन-इंडिया’ ॲपने गाजवला Apple प्लेस्टोअर, WhatsApp वापरकर्त्यांना स्वदेशी पर्याय मिळणार


अरट्टाई अॅप: आज-काल ऑनलाईन झालेल्या आपल्या प्रत्येकाकडे  Whatsapp आहे . जगातल्या कुठल्याही व्यक्तीशी संपर्कात राहू शकणाऱ्या या ॲपला आता एक भारतीय पर्याय उपलब्ध झाला आहे .केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी  व्हाट्सअपला ‘मेड इन इंडिया ‘ ॲपचा पर्याय दिला आहे . हा ॲप लॉन्च झाल्यापासून या अपने स्टोअरवर Whatsapp ला मागे टाकत अधिकृतपणे सोशल नेटवर्किंग मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे .  स्वदेशी तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि व्हाट्सअप सारख्या जागतिक प्लॅटफॉर्मला स्थानिक पर्याय म्हणून हा मेड इन इंडिया मेसेजिंग ‘ Arattai App ‘  सादर करण्यात आला आहे .

चेन्नई स्थित zoho corporation या कंपनीने विकसित केलेल्या अरात्ताई ॲप यूजर फ्रेंडली असून व्हाट्सअप प्लॅटफॉर्म प्रमाणेच यात मेसेजिंग व्हॉइस नोट्स ऑडिओ व्हिडिओ कॉलसह स्टोरी ही पोस्ट करू शकतात . हा नवीन मेसेजिंग आणि कॉलिंग ॲप व्हाट्सअप चा भारतीय पर्याय असल्याचं सांगितलं जात आहे .

Arattai बद्दल सर्व काही

Arattai या नावाचा अर्थ “अनौपचारिक गप्पा” (Casual Chat) असा होतो, जे या ॲपच्या उद्देशाशी पूर्णपणे सुसंगत आहे. दररोजच्या संवादासाठी साधा मेसेजिंग ॲप. Zoho ने लॉन्च केलेल्या या ॲपद्वारे वापरकर्ते मेसेज, फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट शेअर करू शकतात, तसेच व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल, स्टोरीज शेअर करणे आणि चॅनेल व्यवस्थापन करण्यासही सक्षम आहेत. हे ॲप  वैयक्तिक तसेच व्यावसायिक संवादासाठी योग्य आहे आणि प्रेक्षकांशी प्रभावीपणे जोडण्यासाठी अनेक टूल्स उपलब्ध करतो.

मुख्य वैशिष्ट्ये

व्यक्तिगत आणि ग्रुप चॅटसाठी सोपा संवाद

सुरक्षित एंड-टू-एंड एन्क्रिप्शनसह व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल

फाइल्स, इमेजेस आणि इतर मीडिया शेअर करण्याची सुविधा

प्रेक्षकांशी जोडले राहण्यासाठी स्टोरीज आणि ब्रॉडकास्ट चॅनेल

व्यवसायांसाठी फॉलोअर्सशी संवाद साधण्याची टूल्स

Arattai आणि WhatsApp मधील फरक

Arattai मध्ये एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड कॉलिंगची सुविधा आहे, मात्र मेसेजसाठी ही सुविधा नाही. हे WhatsApp च्या डिफॉल्ट एन्क्रिप्शनपासून वेगळे आहे, ज्यामुळे गोपनीयतेबाबत जाणीव ठेवणाऱ्या वापरकर्त्यांसाठी हा महत्त्वाचा फरक ठरतो.

हे का चर्चेत आहे?

Arattai चर्चेत आला तेव्हा धर्मेंद्र प्रधान यांनी X वर पोस्ट करत सरकारच्या ‘स्वदेशी’ उपक्रमाशी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेशी जोडले. केंद्रीय आयटी आणि रेल मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही कॅबिनेट ब्रीफिंगमध्ये Zoho च्या प्रोडक्ट्सचा उल्लेख केला. विशेष म्हणजे, Microsoft PowerPoint ऐवजी Zoho Show वापरून तयार केलेली सादरीकरणही त्यांनी चर्चेत आणली.

आणखी वाचा

Comments are closed.