आशिया-पॅसिफिकमध्ये मनमानी अस्वीकार्य आहे
जयशंकर यांचा अप्रत्यक्षपणे चीनला संदेश
वृत्तसंस्था~ नवी दिल्ली
विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी भारत-जपान, हिंद-प्रशांत फोरमच्या व्यासपीठावरून चीनला अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे. हिंद-प्रशांत क्षेत्राला मुक्त ठेवणे अनिवार्य आहे, परंतु हे जटिल आव्हान असल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे. भारत आणि जपानची भागीदारी काही दशकांमध्ये मजबूत झाली आहे. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांदरम्यान अलिकडेच झालेल्या चर्चेतून आम्ही या संबंधांना किती महत्त्व देतो हे स्पष्ट होते असे म्हणत विदेशमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींच्या जपान दौऱ्याने भविष्याच्या व्हिजनचा पाया रचला असल्याचे उद्गार काढले आहेत.
पुढील 10 वर्षांमध्ये 10 येन ट्रिलियन गुंतवणुकीचे लक्ष्य आमची महत्त्वाकांक्षा दर्शवितो. भारत आणि जपानने पुरवठासाखळी, एआय, सेमी कंडक्टर्स, क्रिटिकल मिनरल्स, स्वच्छ ऊर्जा आणि अंतराळ क्षेत्रावर लक्ष पेंद्रीत करावे असे जयशंकर यांनी म्हटले आहे.
विदेशमंत्री एस. जयशंकर 8 व्या भारत-जपान हिंद-प्रशांत फोरममध्ये सामील झाले. या कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी भारत-जपानच्या संबंधांचा उल्लेख केला. मागील दशकांमध्ये द्विपक्षीय संबंध आणखी दृढ झाले आहेत. आमची भागीदारी मागील दशकांमध्ये पूर्वीपेक्षा अधिक परस्परांवर निर्भर राहिली. हिंद-प्रशांत क्षेत्रात रणनीतिक स्थिरतेला वाढविणे आणि जागतिक स्तरावर आर्थिक स्थिरतेत योगदान देण्याचे काम ही भागीदारी करते. एक स्वतंत्र आणि खुले हिंद-प्रशांत क्षेत्र कायम राखणे एक मजबूत तुलनात्मक तसेच एक जटिल आव्हान देखील असल्याचे उद्गार जयशंकर यांनी काढले आहेत.
व्यापार संबंध होणार मजबूत
पंतप्रधान मोदी आणि जपानच्या पंतप्रधान ताकाइची यांच्यात अलिकडेच चर्चा झाली आहे. ऑगस्ट महिन्यात पंतप्रधान मोदींच्या जपान दौऱ्याने पुढील दशकाच्या संयुक्त दृष्टीकोनाला महत्त्वपूर्ण स्वरुपात अधोरेखित केले. दोन प्रमुख लोकशाही अणि सागरी राष्ट्रांच्या स्वरुपात भारत आणि जपानची हिंद-प्रशांत क्षेत्राबद्दल मोठी जबाबदारी आहे. हिंद-प्रशांत महासागर पुढाकार आमच्या योगदानाला पुढे नेण्याची क्षमता राखून असल्याचे जयशंकर म्हणाले.
Comments are closed.