FIFA WC 2026: अर्जेंटिना-स्पेन फायनल किती वाजता? भारतात सामना फ्रीमध्ये कुठे पाहाल, जाणून घ्या…

फुटबॉल विश्वातील सर्वात मोठा सामना फिफा विश्वचषक 2026 ची FIFA WC 2026 अंतिम फेरी आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे. FINAL MATCH FIFA 2026 या अंतिम लढतीत गतविजेता Argentina vs Spain अर्जेंटिना आणि युरोपमधील बलाढ्य संघ स्पेन आमनेसामने असतील.

स्पेनने उपांत्य फेरीत फ्रान्सचा 2-0 असा पराभव करून अंतिम फेरीत स्थान निश्चित केले, तर अर्जेंटिनाने इंग्लंडचा 2-1 असा पराभव करून सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली. त्यामुळे जगभरातील फुटबॉल चाहत्यांचे लक्ष या अत्यंत चुरशीच्या सामन्याकडे लागले आहे.

अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यातील फिफा विश्वचषक 2026चा अंतिम सामना 20 जुलै (सोमवार) रोजी पहाटे 13.30 वाजता (IST) सुरू होणार आहे. याचा अर्थ हा सामना रविवारी रात्री उशिरा खेळला जाईल.

हा अंतिम सामना अमेरिकेतील न्यू जर्सी येथील ‘मेटलाइफ स्टेडियम’वर होणार आहे. स्थानिक वेळेनुसार 19 जुलै रोजी दुपारी 3 वाजता या सामन्याला सुरुवात होईल.

भारतात सामना कुठे पाहता येईल?

भारतात या सामन्याचे थेट प्रक्षेपण ‘Unite8 Sports’ चॅनेलवर केले जाईल. ज्यांना मोबाईल फोन किंवा लॅपटॉपवर सामना पाहायचा आहे, त्यांच्यासाठी ZEE5 ॲप आणि वेबसाइटवर थेट प्रक्षेपणाची streaming सुविधा उपलब्ध असेल.

सामना मोफत कसा पाहता येईल?

भारतीय चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण ‘DD Sports’ चॅनेलवरही केले जाईल. जर तुमच्याकडे ‘DD Free Dish’ असेल किंवा तुम्ही ‘JioTV’ ॲप वापरत असाल, तर तुम्ही कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय किंवा सबस्क्रिप्शनशिवाय हा सामना मोफत पाहू शकता.

या संपूर्ण विश्वचषकात अर्जेंटिना आणि स्पेन या दोन्ही संघांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

कर्णधार लिओनेल मेस्सीने अर्जेंटिनाला Lionel Messi अंतिम फेरीपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असून, त्याने आतापर्यंत 8 गोल केले आहेत. त्याच वेळी, स्पेनचा युवा स्टार Lamine Yamal लॅमिन यामल यानेही सहा गोल करत शानदार कामगिरी केली आहे.

प्रतिष्ठित विश्वचषक ट्रॉफी कोण उंचावणार, हे पाहण्यासाठी आता संपूर्ण फुटबॉल जगताची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Comments are closed.