Arjun Khotkar warned that he would show what a political earthquake is
महाविकास आघाडीतील काही नेते आणि पदाधिकारी महायुतीच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच शिवसेना पक्षाचे जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी एक मोठे विधान केले आहे.
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर राजकारणात अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. विधानसभेनंतर राज्यात पुढील काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांसाठी सर्व पक्षीय नेतेमंडळींनी आतापासूनच तयारीला सुरूवात केली आहे. अशातच महाविकास आघाडीतील काही नेते आणि पदाधिकारी महायुतीच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच शिवसेना पक्षाचे जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी एक मोठे विधान केले आहे. (Arjun Khotkar warned that he would show what a political earthquake is)
एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना अर्जुन खोतकर यांना विचारण्यात आले की, आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर जालना जिल्ह्यात महाविकास आघाडीला धक्का बसला. यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचे आणखी काही पदाधिकारी महायुतीत येणार असल्याची चर्चा आहे. या प्रश्नावर अर्जुन खोतकर म्हणाले की, महाविकास आघाडीतील महत्त्वाची 8 लोकं आमच्याकडे आली आहेत. यावरून त्यांच्या पक्षातील लोकांचा कल समजून येतो. आता 8 जण आले असले तरी पुढच्या काळात अनेकजण आमच्याकडे येण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे यंदाच्या महापालिका निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत जालना महापालिकेत शिवसेना पक्षाचा महापौर असेल, असा विश्वास अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केला.
हेही वाचा – Jitendra Awhad : धनंजय मुंडे आधुनिक तुकाराम महाराज होऊ शकतात, आव्हाडांची खोचक टीका
राजकीय भूकंप काय असतो हे आम्ही दाखवून देऊ
दरम्यान, जालन्यात यापुढे राजकीय भूकंप कसे कसे येतात तुम्ही पाहा, असे विधान काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. यासंदर्भात अर्जुन खोतकर यांना विचारले असता ते म्हणाले की, कैलास गोरंट्याल फक्त बोलतात, परंतु त्यांच्या बोलण्याला काही आधार नसतो. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे तुम्ही फार गांभीर्याने पाहू नका. खरं तर राजकीय भूकंप काय असतो, हे आम्ही त्यांना दाखवून देऊ, असा इशारा अर्जुन खोतकर यांनी दिला आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील किती आमदार आणि पदाधिकारी महायुतीत जातात? हे पाहावे लागेल.
हेही वाचा – Sanjay Shirsat : ठाकरे – शिंदे एकत्र आले पाहिजे; शिरसाट स्वपक्षीयांसह विरोधकांच्या निशाण्यावर
Comments are closed.