शुभमंगल सावधान! अर्जुन तेंडुलकर अडकला लग्नबंधनात; सानिया चंडोकसोबत विवाहबद्ध

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर हा सानिया चंडोकसोबत विवाह बंधनात अडकला आहे. . हा शाही विवाह सोहळा मुंबईतील वरळी येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये येथे पार पडला. या लग्नसोहळ्याला दिग्गजांनी हजेरी लावली होती. लग्नसोहळ्याला सानियाने लाल रंगाची साडी नेसली होती तर अर्जुनने लाल रंगाची शेरवानी घातली होती. पारंपारिक मराठमोळ्या पद्धतीत हा विवाहसोहळा पार पडला.

लग्न सोहळ्याला क्रिडा, राजकीय व मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते, आमदार, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे व सौ. रश्मी ठाकरे यांनी देखील या लग्न स सोहळ्याला हजेरी लावून वधूवरांना शुभेच्छा दिल्या.

या लग्नाला क्रिडा क्षेत्रातील अजिंक्य रहाणे, अनिल कुंबळे, अजित आगरकर, झहीर खान, महेंद्रसिंह धोनी, आशिष नेहरा, श्रेयस अय्यर, इरफान पठाण, सुनील गावस्कर उपस्थित होते. तर सुप्रिया सुळे, राज ठाकरे, शंकर महादेवन, फरहान अख्तर, युवराज सिंह, शायना एनसी, अमिताभ बच्चन, शाहरुख खान यांनीही हजेरी लावली.

Comments are closed.