अर्जुनच्या लग्नाला यायचं हं…सचिन तेंडुलकरचं राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधींना निमंत्रण

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या घरी सध्या लग्नाची लगबग पाहायला मिळत आहे. सचिनचा मुलगा आणि युवा क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकर लवकरच सानिया चंडोक हिच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात मुंबईत या दोघांचा साखरपुडा पार पडला होता आणि आता लवकरच त्यांच्या लग्नाचे सनई चौघडे वाजणार आहेत. अर्जुनच्या लग्नाची जय्यत तयारी तेंडुलकर कुटुंबात सुरू असून लग्नपत्रिका वाटण्यालाही सुरुवात झाली आहे. याच निमित्ताने मंगळवारी तेंडुलकर कुटुंबाने पंतप्रधान राष्ट्रपती मुर्मू, नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना लग्नाचे आग्रहाचे आमंत्रण दिले. तसेच राहुल गांधी यांनाही लग्नाचे निमंत्रण देण्यात आले आहे.
अर्जुनची होणारी पत्नी सानिया चंडोक ही एका प्रतिष्ठित व्यावसायिक कुटुंबातील आहे. ती प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात असून त्यांचे कुटुंब हॉटेल आणि आईस्क्रीम क्षेत्रातील दिग्गज ‘ग्रॅव्हिस ग्रुप’चे मालक आहेत. प्रसिद्ध आईस्क्रीम ब्रँड ‘बास्किन-रॉबिन्स’ आणि ‘द ब्रुकलिन क्रीमरी’ हे याच समूहाचे भाग आहेत. सानिया स्वतः सध्या मुंबईतील ‘मिस्टर पॉज पेट स्पा अँड स्टोअर’ची संचालक म्हणून जबाबदारी सांभाळत आहे.
डावखुरा वेगवान गोलंदाज असलेला अर्जुन तेंडुलकर देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोव्याचे प्रतिनिधित्व करतो. आयपीएलमध्ये 2021 पासून तो मुंबई इंडियन्सशी जोडला गेला असून त्याने आतापर्यंत आयपीएलमधून सुमारे 1.40 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 2026 च्या आयपीएल हंगामात तो लखनऊच्या संघातून खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुनची एकूण मालमत्ता 21 ते 22 कोटी रुपयांच्या आसपास आहे. अर्जुनला महागड्या गाड्यांची विशेष आवड असून तेंडुलकर कुटुंबाच्या ताफ्यात पोर्श केयेन, बीएमडब्ल्यू आय८ आणि फेरारी 360 मोडेना यांसारख्या आलिशान गाड्यांचा समावेश आहे. सध्या अर्जुन आपल्या कुटुंबासह मुंबईतील वांद्रे येथील आलिशान बंगल्यात राहतो.
Comments are closed.