Marathwada Rain Update: नांदेडमध्ये लष्कराकडून पूरग्रस्तांना मदत; वैद्यकीय शिबिर आणि अन्न वाटप केंद्रांची सुरुवात

नांडेड पाऊस

नांदेड जिल्ह्याच्या पूरग्रस्त भागात, हिंदुस्थानी लष्कराचे पथक राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) आणि नागरी प्रशासनाच्या समन्वयाने पूर मदत कार्य अविरतपणे सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हसनाळ गावाचा सुमारे ८०% भाग अद्यापही पाण्याखाली आहे. यापूर्वी बेपत्ता झालेल्या पाच व्यक्तींपैकी चार जणांचे मृतदेह सापडले असून, एक व्यक्ती अजूनही बेपत्ता आहे.

लष्कराचे जवान पूरग्रस्त कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे काम करत आहेत. बाधित रहिवाशांना तातडीची मदत देण्यासाठी, एक वैद्यकीय शिबिर उभारण्यात आले आहे आणि अन्न वाटप केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

Comments are closed.