अर्नाळा हादरलं! मध्यरात्री घरात घुसून तरुणी व तिच्या आईवर चॉपरने वार, दोघींची प्रकृती गंभीर

अर्नाळा येथील बंदरपाडा गावातील एका घरात घुसून शसस्त्र हल्लोखोराने झोपलेल्या तरुणीवर चॉपरने वार केले. यावेळी तिला वाचवायला गेलेल्या तिच्या आईवरही या हल्लेखोराने हल्ला केला. या हल्ल्यात दोघीही गंभीर जखमी झाल्या आहेत. नेत्रा गोवारी (तरुणी) व लीला गोवारी(आई) अशी त्या दोघींची नावे असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

विरार मधील अथर्व क्लासेसचे प्राध्यापक सचिन गोवारी यांचे कुटुंबीय अर्नाळा येथे राहतात. सोमवारी पहाटे एका हल्लेखोराने त्यांच्या घरात घुसरू गोवारी यांच्या बहिण व आईवर हल्ला केला. या हल्लेखोर तरुणाने काळी जीन्स आणि निळ्या टी-शर्ट घातले असल्याची माहिती मिळाली आहे. सध्या हल्लेखोर फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

दरम्यान या घटनेने या गावातील अनधिकृत भाडेकरूंचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. गावातील अनधिकृत भाडेकरूंची चौकशी व्हावी अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

Comments are closed.