ट्रेनमध्ये हिंदी-मराठी बोलण्यावरुन वाद; 4-5 जणांकडून मारहाण, कल्याणमधील अर्णवने जीवन संपवलं!
कल्याण क्राईम न्यूज कल्याण : कल्याणमधील एक धक्कादायक घटना समोर (Kalyan Crime News) आली आहे. कल्याण पूर्व येथील तिसगाव नाका परिसरातील एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अर्णव खैरे (Arnav Khaire) असं या तरुणाचं नाव आहे.
नेमकं काय घडलं? (Kalyan Crime News)
मुलुंड येथे कॉलेजला जाताना ट्रेनमध्ये धक्का लागला. त्यावरून हिंदी-मराठी बोलण्यावरून वाद झाला. या वादातून चार ते पाच जणांनी अर्णव खैरेला बेदाम मारहाण केली. या मारहाणीनंतर मानसिक तणावात असलेल्या अर्णव खैरे यांनी राहता घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
ही बातमीही वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.