अटक केलेल्या चिन्नाय्या सूत्रधारांची नावे उघडकीस आणतात

एसआयटीकडून सूत्रधारांची चौकशी करण्यासाठी तयारी सुरू : प्रकरणातील अनेकांना अटकेची भीती

प्रतिनिधी/ बेंगळूर

धर्मस्थळविऊद्ध कट रचणाऱ्यांची नावे अटक केलेल्या मुखवटाधारी चिन्नय्याने पोलीस चौकशीदरम्यान उघड केली आहेत. धर्मस्थळ कटामागील सूत्रधारांची चौकशी करण्याची तयारी एसआयटी करत असून कटात सहभागी असलेल्या अनेकांना अटक होण्याची शक्मयता आहे. धर्मस्थळ प्रकरणासंदर्भात एसआयटीने यापूर्वीच मुखवटाधारी चिन्नय्याला अटक केली आहे. याचबरोबर युट्यूबर समीरचीही चौकशी सुरू आहे

या चौकशीदरम्यान, एसआयटी पोलिसांना कटाच्या सूत्रधारांबद्दल माहिती मिळाली आहे. या माहितीच्या आधारे, एसआयटीने सूत्रधारांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अनेकांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस बजावले जाणार आहे, असे सांगितले जात आहे. अटक केल्यानंतर चिन्नय्याने धर्मस्थळ कटात कोण सहभागी आहे?, या प्रकरणात कोणाची आणि कशी भूमिका होती याबद्दल पोलिसांना सर्व काही सांगितले आहे. तसेच त्याच्याशी संबंधित असलेल्या कट रचणाऱ्यांची मोठी यादी पोलिसांना दिली आहे, असे समजते.

चिन्नय्याची सखोल चौकशी केल्यानंतर एसआयटी त्याच्यामागील कट रचणाऱ्यांची चौकशी करण्याची आणि गरज पडल्यास त्यांना अटक करण्याची तयारी करत आहे. त्यामुळे कट रचणाऱ्यांना अटक होण्याची भीती आहे. एसआयटी कोणत्याही गोष्टी घाई न करता आणि कायद्याच्या चौकटीत सर्वकाही नाजूकपणे हाताळत, एकामागून एक कट रचणाऱ्यांना अटक करण्यासाठी पुढाकार घेत आहे, असे म्हटले जात आहे. धर्मस्थळविऊद्धच्या कटात कोणी कट रचला आहे हे लवकरच स्पष्ट होईल. चिक्कय्याने दिलेल्या माहितीच्या आधारे, एसआयटी पोलीस या गुन्हेगारांची पार्श्वभूमी तपासत आहेत. परिस्थितीनुसार त्यांना चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्मयता आहे.

एसआयटी चौकशीदरम्यान चिन्नय्याने ही कवटी 2023 मध्ये एका गटाकडून मिळाली असल्याचे कबुल केले आहे. या गटाने आपल्याला खोटे विधान करण्यास सांगितले होते, असे चिन्नय्याने स्पष्ट केले. आहे. ही कवटी जमिनीतून उत्खनन केलेली नव्हती, तर जंगलातून उचलून आणल्याचे तपासात दिसून आले आहे. या पुराव्याचा वापर करून, चिन्नय्याने धर्मस्थळमध्ये शेकडो मृतदेह पुरल्याचे लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला होता, असे समजते.

एनआयए चौकशीची आवश्यकता नाही

धर्मस्थळ प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्याची विरोधकांची मागणी गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर आणि वाहतूक मंत्री रामलिंगा रे•ाr यांनी फेटाळून लावली आहे. या प्रकरणाची एनआयए चौकशीची आवश्यकता नाही. एसआयटी चौकशीतूनच सत्य बाहेर येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

युट्यूबर सलग दुसऱ्या दिवशी चौकशीसाठी हजर

धर्मस्थळबाबत एआय व्हिडिओद्वारे कथित प्रचाराच्या प्रकरणात युट्यूबर मोहम्मद समीर सलग दुसऱ्या दिवशी बेळतंगडी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाला. रविवारी मोहम्मद समीरची पोलिसांनी पाच तास चौकशी केली होती. तसेच सोमवारी त्याला पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. रविवारी पीएसआय सुब्बापूर मर यांच्या नेतृत्त्वाखाली त्याची सलग 5 तास चौकशी करण्यात आली होती.

Comments are closed.