अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक

कोलकाता:

पश्चिम बंगालमध्ये अल्पवयीन युवतीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी तिच्याच एका नातेवाईकाला अटक करण्यात आली आहे. गेल्या शुक्रवारी या युवतीवर कोलकत्याजवळील तारकेश्वर या स्थानी अतिप्रसंग करण्यात आला होता. ती रस्त्यावर तिच्या आजीसह झोपलेली असताना तिला पळविण्यात आले होते आणि नंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. पहाटे चारच्या सुमारास हे अपहरण घडले होते. नंतर ही युवती तारकेश्वर येथे रक्ताच्या थारोळ्यात सापडली होती. गुन्हाविज्ञान शाखेने घटनास्थळावरुन सर्व पुरावे आणि रक्ताचे नमुने संकलित केले आहेत. सीसीटीव्ही फूटजेही जप्त करण्यात आले आहे. या अल्पवयीन युवतीच्या एका जवळच्या नातेवाईकाला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी केली जात आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी 5 सदस्यांचे एक विषेश तपास दल बनविण्यात आले असून लवकरच गुन्हेगारांना अटक करण्यात येईल, अशी माहिती हुगळी ग्रामीण पोलिसांनी सोमवारी दिली आहे.

Comments are closed.