Ratnagiri News – ब्राउन हेरॉईनसह शहर पोलिसांनी दोघांना केली अटक
रत्नागिरी शहरातील मच्छिमार्केट येथील चर्चसमोर तब्बल 91 हजारांच्या 7 ग्रॅम ब्राउन हेरॉईनसह शहर पोलिसांनी दोघांना अटक केली.आहे. नुरमोहम्मद दिलमोहम्मद खान उर्फ कल्लू (वय 25, रा. भाजी मार्केटसमोर, रत्नागिरी) आणि मस्तान शेख (वय 26, रा. अजगावकरवाडी बाजारपेठ, रत्नागिरी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी व अंमलदार रत्नागिरी शहर पोलीस ठाणे परिसरार्त गस्त घालत असताना चर्चसमोरील रस्त्यावर दोन संशयित तरुण दिसून आले. पोलिसांनी संशयावरून त्यांची कसून चौकशी व झडती घेतली असता, त्यांच्याकडे असलेल्या पिशवीत 91 हजार रुपये किमतीचे 7 ग्रॅम ब्राऊन हेरॉईन (टरकी) या अमली पदार्थाच्या एकूण 182 पुड्या मिळून आल्या. तसेच त्यांच्याकडून 20 हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण 1 लाख 11 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या प्रकरणी पोलीस कर्मचारी दिपराज पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोन्ही संशयितांविरोधात एन.डी.पी.एस. ॲक्ट 1985 च्या कलम 8(क) आणि 21(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
Comments are closed.