Jolly LLB 2 मधून अर्शदला का वगळले…; अभिनेत्याने थेट दिग्दर्शकाला दिला दोष, सांगितले कारण

बॉलीवूडचा बहुप्रतिक्षित चित्रपट Jolly LLB 3 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या ‘Jolly LLB 3’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर आता चाहते चित्रपट कधी येतोय याची वाट पाहात आहेत. या चित्रपटाचा हा तिसरा भाग असून, पहिल्या भागात अर्शद वारसी आणि दुसऱ्या भागात अक्षय कुमार दिसला होता. आता दोघेही तिसऱ्या भागात एकत्र दिसले आहेत. मात्र हे दोघे दुसऱ्या भागात का एकत्र दिसले नाही, असा प्रश्न सातत्य़ाने उपस्थित होत आहे. यावर अभिनेता अर्शदने दिग्दर्शकावर निशाणा साधला आहे.
जॉली एलएलबी ३ या चित्रपटाचा ट्रेलर बुधवारी 10 सप्टेंबर रोजी लाँच करण्यात आला होता. यावेळी चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट तिथे उपस्थित होती. ट्रेलर लाँच दरम्यान, प्रसार माध्यमांनी कलाकरांवर प्रश्नांचा भडिमार केला होता. अशातच मीडियाने अर्शदला दुसऱ्या भागांत का काढून टाकण्यात आले असा प्रश्न विचारला. यावर अर्शदने दिलेल्या उत्तरची सध्या जोरदार चर्चा होत आहे.
ट्रेलर लाँच दरम्यान, अक्षयला चित्रपटातील त्याच्या योगदानाबद्दल विचारण्यात आले. ‘दिग्दर्शक चित्रपटाच्या कथेचे काटेकोरपणे पालन करतो. त्यामुळे त्यात कोणीही बदल करू शकत नाही. चित्रपटाचा दिग्दर्शक कथेच्या अनुषंगाने त्यात बदल करत असतो. यापलीकडे गेलात तर त्यांना बाहेरचा रस्ताही दाखवला जातो. असे अक्षयने म्हटल्यावर, यावर अर्शद लगेच म्हणाला, म्हणूनच जाॅली एलएलबी २ मध्ये मी नव्हतो. अर्शदच्या या उत्तरानंतर सर्वजण हसायला लागले.
जॉली एलएलबी सिरीज पहिला चित्रपट 2013 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर 2017 मध्ये चित्रपटाचा दुसरा भाग आला. ज्यामध्ये अक्षय कुमार दिसला होता. आता अर्शद वारसी आणि अक्षय कुमार जॉली एलएलबी 3 एकत्रित दिसणार आहेत. हा चित्रपट 19 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Comments are closed.