Asia Cup: पाकिस्तानविरुद्ध भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असणार? अर्शदीप खेळणार की नाही?

आशिया कप 2025 (Asia Cup 2025) मधील सर्वात मोठा सामना 14 सप्टेंबर रोजी दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. डिफेंडिंग चँपियन टीम इंडियाचा सामना पाकिस्तानशी होणार आहे (IND vs PAK). हा हाय-वोल्टेज सामन्याची सर्वजण उत्सुकतेने पाहत आहेत. मात्र आता त्या क्षणाची वाट पाहणे संपणार आहे. भारतीय संघाने आपल्या स्टाइलमध्येच स्पर्धेची सुरुवात केली आहे.

यूएईविरुद्ध टीम इंडियाने फक्त 27 चेंडूंत विजय मिळवला. गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली, तर फलंदाजांनीही आपली ताकद दाखवली. यूएईविरुद्ध टीम इंडिया 3 फिरकीपटूंसह मैदानात उतरली होती. आता प्रश्न असा आहे की, कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) पाकिस्तानविरुद्धही हेच धोरण वापरेल का?

टीम इंडियाची बॅटिंग ऑर्डर पूर्णपणे सेट दिसत आहे. अभिषेक शर्मा आणि शुबमन गिलची सलामी जोडी यूएईविरुद्ध चांगली झळकली होती. अभिषेक विशेष चांगल्या लयीत दिसला आणि त्याने डावाची सुरुवातच षटकाराने केली. नंबर 3 वर मागील सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादव उतरला होता. या स्थानावर कर्णधार स्वतः खेळेल की तिलक वर्मा खेळेल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

नंबर पाचवर संजू सॅमसन (Sanju Samson) आणि सहा नंबरवर हार्दिक पांड्या (Hardik pandya) खेळण्याची शक्यता आहे. शिवम दुबे (Shivam Dube) आणि अक्षर पटेल (Axar Patel) फिनिशर म्हणून दिसू शकतात. शिवमचं मागील सामन्यातील गोलंदाजीतील प्रदर्शनही उत्कृष्ट होते, त्याने फक्त 2 धावांत 3 विकेट्स घेतल्या होत्या.

वेगवान गोलंदाजीची कमान जसप्रीत बुमराहकडे (Jasprit Bumrah) असेल. मात्र, हे पाहणे मनोरंजक ठरेल की प्लेइंग 11 मध्ये अर्शदीप सिंगची जागा (Arshdeep singh) असेल की नाही. मागील सामन्यात टीम इंडिया 3 फिरकीपटूंसह खेळली होती. जर अर्शदीप अंतिम संघात सामील झाला, तर वरुण चक्रवर्ती (Varun chakrawarthy) किंवा कुलदीप यादवपैकी (Kuldeep yadav) कोणालातरी बाहेर बसावे लागेल. मागील सामन्यात कुलदीपने कमाल कामगिरी केली होती.

टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11:
अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्राबोर्टी, आर्शदीप सिंग.

Comments are closed.