ऑस्ट्रेलिया दौरा संपताच लगेच मर्सिडीजची चावी हातात! भारतीय खेळाडूनं खरेदी केली अलिशान कार

अर्शदीप सिंग हा भारताच्या सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक मानला जातो. अलिकडच्या काळात त्याने जगभरात चांगली कामगिरी केली आहे, त्याने त्याच्या प्रभावी गोलंदाजी कौशल्याचे प्रदर्शन केले आहे. त्याने अलीकडेच भारतीय टी20 संघासोबत ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता, ज्यात त्याने उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि संघाच्या मालिका विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. दौऱ्यावरून परतल्यानंतर त्याने आता मर्सिडीज कार खरेदी केली आहे.

अर्शदीप सिंगने मर्सिडीज-बेंझ जी-क्लास खरेदी केला

भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने मर्सिडीज-बेंझ जी-क्लास खरेदी केली आहे. त्याची किंमत अंदाजे ₹3 कोटी आहे. ही कार बॉक्सी एसयूव्ही बॉडी स्टाइलचे एक उत्तम उदाहरण आहे. ती उंच असून आलिशान लूक देते. म्हणूनच लोक ही कार पसंत करतात.

अर्शदीप सिंगने 2022 मध्ये भारतीय संघासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आणि तेव्हापासून तो संघाच्या नशिबात महत्त्वाचा घटक आहे. 2022 आणि 2024 च्या टी20 विश्वचषकात त्याने अपवादात्मक कामगिरी केली. टी20 क्रिकेटमध्ये 100 पेक्षा जास्त विकेट्स घेणारा तो एकमेव भारतीय गोलंदाज आहे. त्याने भारतासाठी 105 विकेट्स घेतल्या आहेत.

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला हरवून 2024 चा टी20 विश्वचषक जिंकला तेव्हा अर्शदीप भारतीय संघाचा भाग होता. त्याने या स्पर्धेत एकूण 17 विकेट्स घेत घातक गोलंदाजी कामगिरी केली. 2024 च्या टी20 विश्वचषकात तो भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होता.

Comments are closed.