अर्शदीप सिंग IN, हर्षित राणा OUT!तिसऱ्या टी-20 सामन्यात अशी असू शकते भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. मालिकेचा तिसरा सामना 2 नोव्हेंबरला खेळला जाणार आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता, तर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाचे लक्ष आता तिसऱ्या टी-20 वर असेल. भारत हा सामना जिंकून मालिका 1-1 अशी बरोबरीत आणण्याचा प्रयत्न करेल. तिसऱ्या टी-20 मध्ये भारताच्या प्लेइंग 11 मध्ये मोठा बदल पाहायला मिळू शकतो.

तिसऱ्या टी-20 सामन्यातही शुबमन गिल आणि अभिषेक शर्मा सलामी फलंदाजाची भूमिका निभावू शकतात. अभिषेक शर्माने दुसऱ्या सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी करत अर्धशतक झळकावले होते. त्याने 37 चेंडूंमध्ये 68 धावांची खेळी केली, तर शुबमन गिलने 10 चेंडूंमध्ये 5 धावा केल्या होत्या. तिसऱ्या सामन्यातही या दोघांची जोडी पुन्हा एकदा दिसू शकते.

मिडल ऑर्डरमध्ये संजू सॅमसन नंबर 3 वर आपली भूमिका बजावू शकतो, तर सूर्यकुमार यादव नंबर 4 वर खेळू शकतो. मात्र, मागील सामन्यात संजूने फक्त 2 आणि सूर्याने 1 धाव केली होती. दरम्यान, तिलक वर्मा, अक्षर पटेल आणि शिवम दुबे हे लोअर मिडल ऑर्डरमध्ये फलंदाजी करू शकतात. तथापि, दुसऱ्या सामन्यात या खेळाडूंच्या बॅटमधून धावा निघाल्या नव्हत्या.

स्पिन गोलंदाजी विभागात कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती आघाडी सांभाळू शकतात. दोघांनीही दुसऱ्या सामन्यात प्रत्येकी 2 विकेट घेतल्या होत्या. याशिवाय अक्षर पटेलही महत्त्वाची भूमिका बजावताना दिसू शकतो. तर वेगवान गोलंदाजी विभागात हर्षित राणाच्या जागी अर्शदीपला संधी मिळू शकते, कारण हर्षितने दुसऱ्या सामन्यात निराशाजनक कामगिरी केली होती आणि त्याला एकही विकेट मिळाली नव्हती. तसेच जसप्रीत बुमराह तिसऱ्या सामन्यात मुख्य वेगवान गोलंदाजाची भूमिका पार पाडणार आहे.

Comments are closed.