मेघालयात पुन्हा एकदा जाळपोळ आणि पेट्रोल बॉम्ब हल्ला झाला.
शिलाँग : मेघालयात मागील 24 तासांदरम्यान सरकारी संपत्तींना लक्ष्य करत जाळपोळ आणि पेट्रोल बॉम्ब हल्ल्याच्या नव्या घटना घडल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी शिलाँगमध्ये विद्यार्थ्यांच्या बाइक रॅलीदरम्यान सुरू झालेली हिंसा आता राज्याच्या इतर हिस्स्यांपर्यंत फैलावली आहे. शिलाँगमधील एका पोलीस चौकीवर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला आहे. तर री-भोई येथे तीन सरकारी वाहने आणि एका दुचाकीला जाळण्यात आले. दक्षिण पश्चिम खासी हिल्समध्ये एका सरकारी कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला.
Comments are closed.