पृथ्वीचा उदय! चांद्रप्रदक्षिणेदरम्यान अंतराळवीरांनी टिपली खास छायाचित्र

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

६ एप्रिल २०२६ रोजी ‘ओरायन’ अंतराळ यान चंद्राच्या पलीकडील बाजूने प्रवास करत असताना, ‘आर्टेमिस II’ (Artemis II) च्या अंतराळवीरांनी चंद्राची ही दृश्ये टिपली आहेत. यावेळी पृथ्वीवरून जसा चंद्रोदय पाहायला मिळतो तसे चंद्राच्या प्रदक्षिणे दरम्यान पृथ्वी उदयासमान काही दृश्ये आंतराळवीरांनी टिपलेली दिसतात.

पृथ्वीवरून आपल्याला चंद्र रोज उगवताना आणि मावळताना दिसतो, कारण पृथ्वी स्वतःभोवती फिरते. पण चंद्राची एकच बाजू कायम पृथ्वीकडे असते (Tidal Locking), त्यामुळे चंद्राच्या दर्शनी भागावर उभे राहिल्यास पृथ्वी आकाशात एकाच ठिकाणी स्थिर दिसते. ती ‘उगवताना’ पाहण्यासाठी तुम्हाला चंद्राच्या कक्षेभोवती फिरावे लागते किंवा चंद्राच्या अशा भागात असावे लागते जिथून पृथ्वी क्षितिजावर दिसेल. त्याप्रमाणे आर्टेमिस २ हे चंद्राच्या भोवती फिरत असल्याने पृथ्वीच्या उदयाचे चित्र त्यांना टिपता आले आहे.

विशेष – आर्टेमिस -2 चंद्रप्रदक्षिणा

Comments are closed.