अनुवादित साहित्य निर्मितीतील वैविध्यता
जगभरात ऑगस्ट महिना अनुवाद क्षेत्रातील महिलांच्या कार्याला अधोरेखीत करणारा महिना म्हणून ओळखला जातो. मराठी भाषेत इतर भाषेतून मुख्यत हिंदी व इंग्रजी भाषेतील साहित्याचा अनुवाद करण्यात महिला अनुवादकांची संख्या लक्षात येण्याजोगी आहे. अनुवाद क्षेत्रातील वैविध्यपूर्णतेच्या ध्यासामुळेच इंग्रजी व हिंदी भाषेतील उत्तम साहित्यासोबत इतर परकीय भाषांमधील साहित्य मराठीत आणण्यात अग्रक्रम लागतो तो जपानी आणि जर्मन भाषांचा. सध्या जगभर या दोनही भाषेतील साहित्याला चोखंदळ वाचकांकडून पसंती मिळत आहे. यामुळेच त्या त्या देशातील प्रादेशिक भाषांमध्ये जपानी व जर्मन साहित्याचे अनुवाद होताना दिसत आहेत. यंदाच्या ‘दर्पणकार बाळशास्त्राr जांभेकर अनुवाद पुरस्कारा’साठी या दोनही भाषेतील अनुवादक, लेखकांच्या मराठीतील उत्कृष्ट अनुवादित ग्रंथांची निवड झाली आहे. पाळंमुळं’ हे मूळ जर्मन लेखक साशा स्टानिसिच यांचे पुस्तक ज्याचा जर्मन भाषेतून मराठी अनुवाद केला आहे जयश्री हरि जोशी यांनी. दुसरे पुस्तक ‘त्सुबाकी स्टेशनर्स’ हे मूळ जपानी लेखक इतो ओगावा यांचे पुस्तक ज्याचा जपानी भाषेतून मराठी अनुवाद मयुरेश कुलकर्णी यांनी केला आहे. या महिन्याच्या जागतिक संकल्पनेनुसार अनुवाद क्षेत्रात भरीव योगदान देणाऱया महिला म्हणून जयश्री हरी जोशी यांचे दुहेरी अभिनंदन करायला हवे!
Comments are closed.