अज्ञानाच्या राज्यात गुणांचे मूल्य होत नाही

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अरे राजहंस तू इथे का आला आहेस असे दिसते की बदक हा हंस आहे
जोपर्यंत ते असे म्हणतील की हे बदक आहे आणि मूर्ख लोक नाही तोपर्यंत त्याला पावलाने त्याच्याच भूमीकडे परत जाऊ द्या.

अरे राजहंसा, तू इथे का आला आहेस? येथे तर जो बगळा आहे, त्यालाच लोक हंस समजतात.
म्हणून तू ताबडतोब आपल्या देशात परत जा; नाहीतर हे मूर्ख लोक तुलाच बगळा म्हणू लागतील.
ज्या ठिकाणी अयोग्य लोकांना मान आणि योग्य लोकांची कदर नाही, तेथे खरा गुणी माणूस गेला तर त्याचीही किंमत उरत नाही.

उलट त्याची ओळखच चुकीची केली जाते. जिथे अज्ञानाचे राज्य आहे, तिथे गुणी माणसाचे मूल्य होत नाही;
त्यामुळे अशा ठिकाणापासून दूर राहणेच शहाणपणाचे आहे. आजच्या काळात तर याची प्रचिती सहज येते.

 डॉ. समीरा गुजर-जोशी

Comments are closed.