साय-फाय – सायबर वॉर
>> प्रसाद ताम्हणकर, [email protected]
इराण, अमेरिका-इस्रायल यांच्यातील संघर्ष आता केवळ रणांगणापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो सायबर स्पेसमध्येही अत्यंत तीव्र स्वरूपात लढला जात आहे. आधुनिक युद्धात सायबर हल्ले हे पाचवे रणांगण मानले जाते, जिथे संगणक नेटवर्क, सॉफ्टवेअर आणि डेटा हेच मुख्य शस्त्र बनतात. सायबर हल्ल्यांचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शत्रूची क्षमता कमकुवत करणे, त्यांची गुप्त माहिती चोरणे आणि त्यांच्या पायाभूत सुविधांमध्ये अडथळे निर्माण करणे. उदाहरणार्थ, वीजपुरवठा खंडित करणे, बँकिंग प्रणाली हॅक करणे, लष्करी संप्रेषण बंद पाडणे, गुप्त कागदपत्रे चोरणे हे असते.
सायबर युद्धातील सर्वात प्रसिद्ध उदाहरण म्हणजे stunxnet cyber weapon. हा एक अत्यंत प्रगत संगणक व्हायरस होता, जो सुमारे 2010 च्या सुमारास इराणच्या अणू कार्पामावर हल्ला करण्यासाठी वापरण्यात आला. हा व्हायरस विशेषत इराणमधील Natanz Nuclear Facilityयेथील सेंट्रीफ्यूज यंत्रणांना लक्ष्य करत होता. यामुळे यंत्रे चुकीच्या गतीने फिरू लागली आणि स्वतच खराब झाली. महत्त्वाचे म्हणजे हा हल्ला पूर्णपणे डिजिटल होता. एकही गोळी झाडली गेली नाही, पण मोठे नुकसान झाले. असे मानले जाते की, हा हल्ला अमेरिका आणि इस्रायल यांनी संयुक्तपणे केला होता. मात्र यासंदर्भात दोन्ही देशांनी कधीही अधिकृत कबुली दिलेली नाही.
इस्रायल हा सायबर सुरक्षेत जगातील आघाडीचा देश मानला जातो. त्यांची गुप्तचर संस्था ळहग्t 8200 ही अत्याधुनिक सायबर ऑपरेशन्ससाठी प्रसिद्ध आहे. इस्रायल अनेकदा इराणच्या लष्करी आणि अणू प्रकल्पांवर सायबर हल्ले करून त्यांची प्रगती मंदावतो.सायबर हल्ल्याचे घातक क्षमता आणि वाढते महत्त्व पाहून इराणनेही सायबर क्षेत्रात आपली ताकद वाढवली आहे. 2012 मध्ये इराणशी संबंधित गटांनी एaल्dग् Araस्म्द या तेल कंपनीवर एप्aस्ददह नावाचा हल्ला केला, ज्यात हजारो संगणकांचे डेटा नष्ट झाले. अमेरिकेतील बँकिंग क्षेत्रावरDDoS (Distributed Denial of Service) हल्ले करून वेबसाइट्स ठप्प केल्या गेल्या.
अमेरिका आणि इस्रायल यांच्याकडे अत्याधुनिक सायबर तंत्रज्ञान आणि मजबूत संरक्षण यंत्रणा आहेत. ते केवळ हल्लेच करत नाहीत, तर शत्रूच्या सायबर हल्ल्यांपासून स्वतचे संरक्षण करण्यासाठीही मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक करतात. दुसरीकडे इराणनेही सायबर क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे आणि अनेकदा अमेरिकन व इस्रायली संस्थांवर हल्ले केल्याचे आरोप त्यांच्यावर झाले आहेत. सायबर हल्ल्यांचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांची गुप्तता. पारंपरिक युद्धात हल्लेखोर ओळखणे सोपे असते, पण सायबर हल्ल्यांमध्ये हल्लेखोराची ओळख पटवणे कठीण असते. त्यामुळे हे हल्ले नाकारता येण्याजोगे (Deniable) ठरतात, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय तणाव वाढतो, पण थेट युद्ध टाळले जाते.
सायबर हल्ले केवळ तांत्रिक नसतात, तर मानसिक युद्धाचाही भाग असतात. बनावट सोशल मीडिया अकाऊंट्स वापरून प्रचार केला जातो, खोटय़ा बातम्या पसरवून जनतेत गोंधळ निर्माण केला जातो, निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो. सायबर युद्धाचे सर्वात मोठे वैशिष्टय़ म्हणजे त्याची अदृश्यता आणि वेग. अशा हल्ल्यांचे हल्लेखोर कोण आहे हे शोधणे कठीण असते. सायबर हल्ल्यांच्या मदतीने युद्ध न जाहीर करतादेखील शत्रू राष्ट्राचे मोठे नुकसान करता येते. मात्र काही वेळा सामान्य नागरिकही या युद्धाचे बळी ठरू शकतात.
इराण, अमेरिका-इस्रायल यांच्यातील संघर्षात सायबर हल्ले हे अत्यंत प्रभावी शस्त्र बनले आहे. भविष्यात हे युद्ध अधिक प्रगत आणि धोकादायक होण्याची शक्यता आहे. हे युद्ध अधिकाधिक डिजिटल स्वरूप धारण करेल, ज्यामध्ये सायबर सुरक्षा आणि तंत्रज्ञानाची भूमिका अधिक निर्णायक ठरेल. त्यामुळे प्रत्येक देशाने सायबर सुरक्षा मजबूत करणे, तंत्रज्ञानात गुंतवणूक वाढवणे आणि जागरूकता निर्माण करणे अत्यावश्यक आहे हेच यातून समोर येत आहे. हिंदुस्थानचा सायबर सुरक्षा खर्च मागील काही वर्षांत सतत वाढत आहे, पण अजूनही विकसित देशांच्या तुलनेत कमी मानला जातो. आपल्या देशात सायबर सुरक्षा क्षेत्रातील एकूण खर्च 2026 मध्ये सुमारे त्र् 3.4 अब्ज (28,000 + कोटी) होण्याचा अंदाज आहे.
Comments are closed.