साई-फाय-डीएनए वाद

>> प्रसाद तम्हंकर

मानवी शरीर आणि त्याचा अभ्यास हा एक अद्भुत विषय आहे. आपल्या शरीरात अनेक घटक कार्यरत असतात. मात्र मानवी शरीरात असलेला अ हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. आता हाच अ कृत्रिमरीत्या प्रयोगशाळेत तयार करण्याच्या एका प्रकल्पावर शास्त्रज्ञांनी काम करण्यास सुरुवात केली आहे. प्रकल्पाची घोषणा झाल्यापासून तो अत्यंत वादात सापडला असून या प्रकल्पाचे फायदे आणि तोटे यावरून जगभरातील शास्त्रज्ञांमध्ये दोन तट पडल्याचे समोर येत आहे. हा प्रकल्प मानवासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो असा एका गटाचा दावा आहे, तर हे संशोधन चुकीच्या हातात पडल्यास संपूर्ण जगाला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी भीती दुसरा गट व्यक्त करत आहे.

जगातील सर्वात मोठी सेवाभावी वैद्यकीय संस्था असलेल्या वेलकम ट्रस्टने या प्रकल्पाची सुरुवात करण्यासाठी 1 कोटी पौंड म्हणजेच 115 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या प्रकल्पावर होत असलेली टीका गैर असल्याचे ट्रस्टला वाटते. या प्रकल्पामुळे अनेक गंभीर आजारांवर जलद उपचार होऊ शकतात, मानवी आयुष्य वाढून ते अधिक आरोग्यपूर्ण होण्यास मदत होऊ शकते, तसेच अनेक गंभीर आजारांवर रामबाण उपचार शोधण्यासदेखील या प्रकल्पामुळे मदत मिळेल असा विश्वास ट्रस्टने व्यक्त केला आहे. दुसरीकडे या संशोधनामुळे भविष्यातील मानवी पिढय़ांमध्ये काही अनपेक्षित बदल घडून येऊ शकतात अशी शंका विरोधी गटाने व्यक्त केली आहे.

या प्रकल्पाने अनेक शक्यता सत्यात उतरण्यास वाव मिळणार आहे. या संशोधनाचा प्रमुख हेतू हा रोगप्रतिकारक पेशी तयार करण्याचा आहे, असे या प्रकल्पात सहभागी झालेले डॉक्टर सांगतात. या रोगप्रतिकारक पेशींचा वापर हृदय, यकृत अशा खराब झालेल्या अवयवांना पुन्हा बरे करण्यासाठी करता येईल. तसेच मानवी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीदेखील या पेशी उपयोगी पडू शकतील. ज्यामुळे लोकांचे आयुष्यमान वाढण्यास मदत होईल. ते अधिक निरोगी बनेल आणि मुख्य म्हणजे वाढत्या वयाबरोबर उद्भवणारे आजारदेखील कमी होत जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या प्रकल्पाला विरोध करणारा गट मात्र वेगळी शंका व्यक्त करत आहे. ‘सर्व संशोधक हे चांगल्या हेतूने कार्यरत आहेत यावर आमचा विश्वास आहे. मात्र अनैतिक मार्गाचा वापर करणारे संशोधक या संशोधनाच्या मदतीने अधिक उन्नत मानव तयार करण्याचा प्रयत्न करू शकतात. युद्धासाठी किंवा जैविक शस्त्र बनवण्यासाठीदेखील त्याचा वापर करू शकतात ही भीती आहे, असे या गटाचे म्हणणे आहे. विरोधी गटातील काही संशोधकांनी एक वेगळी शंकादेखील व्यक्त केली आहे. हे संशोधन चुकीच्या हातात पडल्यास त्याच्या मदतीने काही वेगळ्या गुणांचा मानव तयार करणे किंवा मानवी अ असलेला एखादा वेगळा जीव जन्माला घालणे असे प्रयत्नदेखील होऊ शकतात. असा एखादा कृत्रिम मानव अथवा तत्सम जीव जन्माला घातला गेला तर त्याची मालकी कोणाकडे असेल आणि त्याच्यासाठी कायदे काय असतील अशी शंका ते व्यक्त करतात.

या प्रकल्पाचे समर्थन करणाऱयांच्या मते आजवर आपण अस्तित्वात असलेल्या अ मध्ये काही बदल करून त्याचा अभ्यास करत आहोत आणि त्यासंदर्भात अधिक ज्ञान मिळवत आहोत. मात्र शून्यापासून सुरुवात करून अ बनवण्याचे संशोधन आपल्याला अ प्रत्यक्षात कसे काम करतो हे जाणून घेण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे. हा प्रकल्प सध्या फक्त टेस्ट टय़ूब बेबी आणि डिशपुरता मर्यादित असणार आहे आणि या संशोधनाच्या मदतीने कोणत्याही नव्या जीवाला जन्म दिला जाणार नाही. मात्र हे नवे संशोधन संशोधकांना मानवी जीवनावर पूर्वी कधीही न मिळालेले नियंत्रण मिळवून देईल याबाबत कोणतेही दुमत नाही. हे संशोधन मानवी जीवनाच्या कल्याणासाठी करण्यात येत असले तरी या संशोधनाचा गैरवापर झाल्यास त्याला रोखणारा कोणताही खात्रीशीर मार्ग सध्या तरी अस्तित्वात नाही.

[email protected]

Comments are closed.