दखल- प्रदीर्घ रुग्णसेवेचा अनुभवी पैस
>> डॉ.? वृषाली किनहालकर
प्रसूतिशास्त्र या विषयात काम करणे म्हणजे एक वसा आहे. डॉ. सविता पानट यांचे ‘आई होताना’ हे पुस्तक म्हणजे या विषयातील एक अथक प्रवास आहे. रुग्ण, त्याचे नातेवाईक आणि डॉक्टर यांच्यामध्ये असणारा संवादाचा एक भक्कम असा साकव म्हणजे हे पुस्तक!
लेखिकेचा अर्धशतकापेक्षाही अधिक असा प्रसूतिशास्त्र या विषयातला प्रगाढ अनुभव, अंगभूत लेखन कौशल्य आणि मूलभूत शिक्षकी वृत्ती यामुळे हे पुस्तक उत्तमरित्या साकार झालेले आहे. वैद्यकीय सेवेकडे केवळ व्यवसाय म्हणून न पाहता तत्त्वनिष्ठपणे रुग्णांची सेवा करणे हे रुग्णसेवेचे खरे मूल्य आहे, असे लेखिका आजच्या डॉक्टरांना आणि पुढच्या पिढय़ांनाही स्वानुभवातून सांगतात.
आधुनिक विज्ञान, नवनवे शोध, गुणकारी औषधे आणि स्त्राrचे स्वतच्या आरोग्याविषयी जागरूक असणे, यामुळे स्त्राr आरोग्याची वाटचाल बरी सुरू आहे. सुधारित देशाच्या जागतिक पातळीवरील अपेक्षित मानकांपासून आपली स्त्राr बऱयापैकी दूर आहे; परंतु योग्य वाटेने प्रवास तर सुरू झाला आहे. जसे एखाद्या झाडाचे बी लावल्यानंतर त्याचे चांगले रोप होईपर्यंतच जास्त काळजी घ्यावी लागते, तसेच गर्भाचेही असते. वास्तविक उत्तम आहार आणि निरोगी प्रकृती ही प्रत्येक स्त्राrची अत्यंत आवश्यक आणि मूलभूत अशी गरज आहे. म्हणून गरोदरपणात आणि एरवीही तुमचा आहार, पौष्टिक, स्वच्छ आणि चौरस हवा. याविषयी लेखिका शास्त्राrयदृष्टय़ा माहिती देतात.
हे पुस्तक लिहिण्यामागचा लेखिकेचा उद्देश रुग्ण-डॉक्टर संवाद करण्याचादेखील आहे, त्याचबरोबर आपल्या अनुभवांची शिदोरी नव्या पिढी पुढे ठेवून त्यांना एक हळूवार उपदेश करण्याचाही आहे. कालचा प्रवास कसा होता हे नव्या पिढीला सांगून त्यांना सावध करण्याचाही आहे.
अनेक समृद्ध अनुभवांच्या कथा या पुस्तकात पानोपानी आढळतात. यात लेखिकेने मुलगी शहाणी होते म्हणजे नेमके काय घडते आणि यादरम्यान पालकांनी काय करावे याविषयी वैज्ञानिकदृष्टय़ा माहिती सांगितली आहे. गरोदरपण आणि मातृत्वाचे लेणे ही फक्त स्त्राrचीच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे यासंबंधीची जाणीव उदाहरणासह करून दिली आहे.
गरोदरपणातील विविध तपासण्या आणि गर्भावस्थेदरम्यान येणारे समज-गैरसमज याविषयीची शास्त्रशुद्ध माहिती सांगितली आहे. प्रसूती आणि आई होण्याची अनुभूती जितकी वेदनादायी तितकीच आनंददायीदेखील असते या विषयाची माहिती प्रस्तुत पुस्तकात सहजसोप्या भाषेत मिळते. या माहितीने गर्भवतीस प्रसूतीची भीती कमी होण्यास नक्की मदत होईल.
याबरोबरच प्रस्तुत पुस्तकात बालसंगोपन करताना घ्यावयाची काळजी तसेच आई आणि बाळाशी संबंधित प्रश्नोत्तरे या विषयावर सविस्तर विवेचन केलेले आहे. एवढेच नव्हे तर डॉक्टर आणि रुग्णाचे नाते, आजची बदलती नैतिकता, स्त्रियांच्या आरोग्याशी संबंधित असंख्य समस्या आणि त्यांचे निराकरण याविषयी लेखिकेने आपले विविध अनुभव विस्तृतपणे लिहिले आहेत. पुस्तकाला साजेशी चित्रे आणि लेखाच्या शेवटी दिलेला सारांश स्वरूपी संदेश यामुळे पुस्तक वैशिष्टय़पूर्ण झाले आहे. अनुभवसमृद्ध डॉक्टरांच्या नजरेतून मांडलेला स्त्राr आरोग्याचा हा लेखाजोखा पालक होऊ पाहणाऱया प्रत्येकासाठी मार्गदर्शक ठरेल.
ज्येष्ठ समीक्षक व लेखक डॉ. सुधीर रसाळ यांनी प्रस्तावनेत म्हटले आहे की, ‘या ग्रंथामुळे स्त्रियांचे अनेक शारीरिक, आरोग्यविषयक आणि सामाजिक प्रश्न व्यापकपणे समाजासमोर आले आहेत. गर्भारपणातील आरोग्यविषयक आणि सामाजिक समस्यांची अतिशय सुबोध अशी चर्चा आणि उपायांसंबंधीचे मार्गदर्शन या ग्रंथात आहे.’ यावरून असेच वाटते की, पुस्तकभर अनाहत नाद असावा तसा सूक्ष्म संयत आणि मुख्य म्हणजे समष्टीच्या कल्याणाचा सूर असणारा एक अप्रत्यक्ष हितोपदेश आहे. सर्वच स्त्रियांसाठी मार्गदर्शक असणारा हा ग्रंथ प्रत्येक कुटुंबाने आपल्या संग्रही ठेवायला हवा.
आई होताना…
लेखक डॉ
प्रकाशने: साकेत प्रकाशन
पृष्ठे ः 208 किंमत: 325 रुपये
Comments are closed.