समाजभान- कल्पनाशक्ती आणि वर्तमान जग
>> योगेश मिश्रा
भारतीय उद्योगजगातील मोठे उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी अभियंता आणि एमबीएसारख्या पदव्या मिळवणाऱयांनी कला आणि संस्कृतीचा अभ्यास करणे गरजेचे असल्याचे सांगितले. या अभ्यासातून ते चांगला निर्णय घेण्यास सक्षम होतील, असे महिंद्रा म्हणत आहेत. एकंदरीत सध्या जगात माहितीचा भडीमार असताना आणि ते उपलब्ध होत असताना काळानुरूप जोडलेल्या मेंदूची गरज आहे. एकापरीने ते कल्पनाशक्ती असलेल्या मेंदूचा विचार मांडत आहेत. कल्पनाशक्तीत गुंतवणूक करण्याचा विचार ते करत आहेत. कामगारांचे शोषण करणाऱया कंपन्यांना या गोष्टी खटकणे स्वाभाविकच आहे. परंतु आइनस्टाईन आणि न्यूटनसारख्या शास्त्रज्ञांनी किंवा दा विंचीसारख्या विचारवंतांनी किंवा एलॉन मस्क, बिल गेट्स यांसारख्या उद्योगपतींनी केवळ बे दुणे चार हे गणित फॉलो केलेले नाही. उलट त्यांनी स्वत:ला संगीत, तत्त्वज्ञान, कला, साहित्य क्षेत्रातही झोकून दिले. या बळावरच त्यांनी आपल्या कल्पनाशक्तीला पंख दिले.
जरा विचार करा, मानवाला कल्पनाशक्तीच नसती तर? कल्पनाशक्तीविना जगणं केवळ नीरसच झालं नसतं, तर भकास बनलं असतं. नवे शोध, आधुनिकता या सर्व गोष्टी उदयासच आल्या नसत्या. आजवर यंत्रांकडे कल्पनाशक्ती नव्हती; पण मशीन लर्निंगच्या युगात यंत्रेदेखील कल्पना करू लागली आहेत. कल्पनांच्या बळावरच मानवी आयुष्याचा विकास आणि प्रगती निश्चित केली जात आहे आणि यासाठी त्याला मूर्त स्वरूप दिले जात आहे. कल्पनाशक्ती नसेल, कल्पनाविलास नसेल तर भवितव्यही नसेल. कल्पनाशक्तीच्या बळावरच आपल्याला असाध्य आजारांवर नवनवीन संशोधन, नवीन तंत्रज्ञान, नवीन गॅझेट्स, नवीन जग आदी गोष्टी करण्यास चालना मिळाली आहे, हे विसरून चालणार नाही.
आपण कल्पनांना, विचारांना निरर्थक, वेळेचा अपव्यय, अनुत्पादक म्हणून गृहीत धरले आहे. नुसत्या विचारातून किंवा कल्पनेतून पोटही भरत नाही आणि खिसाही, असा तर्क दिला जातो. म्हणूनच तर इंजिनीअरिंग, वैद्यकीय शिक्षण, सरकारी नोकरीची इच्छा बाळगणाऱयांची आणि त्यातून पैसा कमाविणाऱयांची चढाओढ सुरू आहे. आज स्पर्धेचे युग आहे. या जीवघेण्या स्पर्धेत कोणी 70 तास काम करण्याचा मुद्दा मांडत आहे तर कोणी 90 तास. आकडय़ांचीदेखील स्पर्धा आहे. कामगारांनाही कंपनीसाठी जीव तोडून मेहनत करण्यास सांगितले जात आहे. बायका-मुलांना विसरून जा. स्वत:च मशीन व्हा. काम हेच लक्ष्य आहे. ते पूर्ण करण्यासाठी प्रचंड बळ लावा, असे सांगितले जात आहे.
रोबो आणि एआयच्या माध्यमातून माणसाला पर्याय तयार केला जात आहे. अर्थात ही तयारी भयातून नाही तर कामगिरीच्या रूपातून केली जात आहे. देशाला उच्च स्थानावर नेण्याच्या गोष्टी केल्या जात आहेत. या गोष्टी कंपनीसाठी नाही तर देशासाठी आवश्यक असल्याचे ठसविले जात आहे. अशा वेळी भारतीय उद्योगजगातील मोठे उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी अभियंता आणि एमबीएसारख्या पदव्या मिळवणाऱयांनी कला आणि संस्कृतीचा अभ्यास करणे गरजेचे असल्याचे सांगितले. या अभ्यासातून ते चांगला निर्णय घेण्यास सक्षम होतील, असे महिंद्रा म्हणत आहेत. एकंदरीत सध्या जगात माहितीचा भडीमार असताना आणि ते उपलब्ध होत असताना काळानुरूप जोडलेल्या मेंदूची गरज आहे. एकापरीने ते कल्पनाशक्ती असलेल्या मेंदूचा विचार मांडत आहेत. कल्पनाशक्तीत गुंतवणूक करण्याचा विचार ते करत आहेत.
कामगारांचे शोषण करणाऱया कंपन्यांना या गोष्टी खटकणे स्वाभाविकच आहे. परंतु आइनस्टाईन आणि न्यूटनसारख्या शास्त्रज्ञांनी किंवा दा विंचीसारख्या विचारवंतांनी किंवा एलॉन मस्क, बिल गेट्स यांसारख्या उद्योगपतींनी केवळ बे दुणे चार हे गणित फॉलो केलेले नाही. उलट त्यांनी स्वत:ला संगीत, तत्त्वज्ञान, कला, साहित्य क्षेत्रातही झोकून दिले. अभ्यास केला. त्यांनी कलेचा छंद बाळगला. या बळावरच त्यांनी आपल्या कल्पनाशक्तीला पंख दिले.
कल्पनाशक्तीच जगाला वेगळे रूप देण्याचे काम करते. आतापर्यंत आपण काय काय केले नाही. पुढे काय काय करणार नाहीत. या गोष्टी केवळ कल्पनाशक्तीच्या बळावर होत आहेत. या कामात गुंतवणूक करणारेदेखील कल्पनाशक्तीचे उगमस्थान राहिलेले आहेत. त्यांच्या अतुलनीय, अशक्यप्राय वाटणाऱया विचारांना महत्त्व दिले आणि ते साकार करण्यासाठी त्यांच्यावर विश्वास व्यक्त करण्यात आला. कल्पनेतूनच कल्पकता विकसित होते आणि तो संशोधन, आविष्काराला प्रोत्साहन देणारा `स्पार्क’ निर्माण करतो. त्याच्या सािढयेतूनच कलाकार उत्कृष्ट कलाकृती सादर करतात, लेखक कादंबरी लिहितात, संगीतकार हृदयाचा ठाव घेणाऱया संगीताची निर्मिती करतात. कल्पनाशक्ती आपल्याला सामान्य स्थितीपासून मुक्ती देण्याचे काम करते आणि आपल्या मेंदूसमोर व्यापक विचारांची कवाडे खुली करते आणि असामान्य कामगिरीकडे नेते.
चर्चा, परिसंवाद आणि चिंता 90 काय, शंभर तासदेखील चालतील. पण परीक्षेतील यश, नोकरी, पराभूत मन, दमलेल्या शरीराकडून काम करून घेणे, आरक्षणाच्या पलीकडे जाणे, कल्पनाशक्ती वाढविणे, नावीण्यपूर्णता अंगिकारणे आणि सर्वात महत्त्वाचे त्याला बालपणापासूनच प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. 53 देशांच्या ग्लोबल इंटलेक्चुअल प्रॉपर्टी इंडेक्समध्ये भारत 40 व्या स्थानावर कशासाठी आहे, हा खरा प्रश्न आहे. भारत आपल्या जीडीपीच्या केवळ 0.7 टक्के संशोधन आणि विकासावर खर्च करतो तर अमेरिका 2.8 टक्के, इस्रायल 4.3 टक्के, कोरिया 4.2 टक्के खर्च करतो. ही आकडेवारी पाहिली तर भारतात संशोधनाचे प्रमाण कमी कशामुळे आहे हे कळते. कित्येक तास झोपल्याची चर्चा का होते? पुढे जाण्यासाठी सर्वकाही मागे सोडून देण्याचे का शिकवले जाते? कामकाजाच्या ठिकाणी स्वत:चे जग तयार करण्याचा मुद्दा बोलला जात आहे. त्यामुळे कामाच्या तासांनी केवळ पोटाच्या गरजा भागविल्या पाहिजेत, असे आम्हाला वाटते. आत्म्याच्या गरजा, समाज आणि देशाच्या गरजा, जगाला सौंदर्यसृष्टी बहाल करण्याची गरज कधी पूर्ण होईल? कामाच्या तासांव्यतिरिक्त हे कोण पूर्ण करेल?
कल्पनाशक्तीची कोणत्याही मापकाद्वारे मोजदाद करता येत नाही. . कल्पना ही सर्वांमधील असामान्य देणगी आहे आणि ती अमर्याद संधीचे दरवाजे खुले करून देते. परंतु कामाच्या वाढत्या तासांत तिचे खच्चीकरण होते. तूर्त वाढत्या कामाच्या तासांच्या निमित्ताने या मुद्दय़ावर चर्चा तर सुरू झाली हे बरे झाले. निसर्गाने माणसाला मेंदू नावाची सर्वात मोठी आणि कल्पनाशक्तीची ताकद प्रदान केली आहे. तिला कुजविण्यापेक्षा धारदार करा.
(लेखक ज्येष्ठ विश्लेषक आहेत.)
Comments are closed.