वेधक – ‘रीड लातूर’चा वाचनयज्ञ

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

>> अभय मिरजकर

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके देऊन त्यांच्या कल्पनाशक्तीला पंख देण्याचे काम ‘रीड लातूर’ या उपामातून केले जाते. चित्रपट निर्मात्या आणि वाचनप्रेमी दीपशिखा देशमुख यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपामाने लातूर जिह्यातील 150 जिल्हा परिषद शाळांमधील सुमारे 25 हजार विद्यार्थ्यांपर्यंत वाचनाचे विश्व पोहोचविले आहे. जवळपास सहा हजार पुस्तकांच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांच्या ज्ञानविश्वाचा विस्तार करण्याचा हा प्रयत्न खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे.

पुस्तकांच्या सहवासातून मुलांना नवे विचार, नवे अनुभव आणि नव्या जगाची ओळख होते. ‘रीड लातूर’ या उपामामागेही हाच विचार आहे. शालेय पाठय़पुस्तकांपुरते विद्यार्थ्यांचे वाचन मर्यादित न राहता त्यांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमधील गोष्टी, साहसकथा, चरित्रे, दंतकथा आणि विविध विषयांवरील साहित्य वाचण्याची संधी मिळावी, हा या उपामाचा मुख्य हेतू आहे.

या वयात वाचलेली पुस्तके मुलांच्या विचारविश्वाला आकार देतात, कल्पनाशक्तीला चालना देतात आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करतात. लातूर जिह्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने 6 एप्रिल 2022 रोजी औसा तालुक्यातील भादा येथील जिल्हा परिषद शाळेत ‘रीड लातूर’ उपामाचा शुभारंभ झाला. एक पुस्तक देत, पुस्तकदानाच्या माध्यमातून समाजातील व्यक्तींना या उपामात सहभागी होण्याची संधी मिळाली. अनेक व्यक्ती, पुस्तकप्रेमी आणि प्रकाशक यांच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांचा संग्रह उभा राहिला. पुस्तके शाळेत पोहोचविणे हा उपामाचा पहिला टप्पा; मात्र ती पुस्तके मुलांच्या हातात पडणे, त्यांनी ती आवडीने वाचणे आणि वाचलेल्या साहित्याचा विचार करणे हा त्याहून महत्त्वाचा टप्पा आहे.

काही शाळांमध्ये आठवडय़ातील ठरावीक दिवशी, तर काही ठिकाणी दररोज मध्यंतराच्या वेळेत विद्यार्थ्यांना पुस्तके वाचण्यासाठी दिली जातात. त्यामुळे नियमित अभ्यासासोबत अवांतर वाचनासाठी स्वतंत्र वेळ उपलब्ध होतो. वाचनातून मिळालेले ज्ञान विद्यार्थ्यांनी स्वतच्या शब्दांत व्यक्त करावे, त्यांच्या लेखनकौशल्याला चालना मिळावी आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा, यासाठी उपामांतर्गत उत्कृष्ट वाचक आणि निबंधलेखन अशा स्पर्धांचे आयोजन केले जाते.

Comments are closed.