उद्याच्या भरवशावर निर्धास्तपणे विसंबू नका

>> डॉ समीरा गुजर-जोशी

रात्र निघून जाईल आणि चांगली सकाळ होईल. कमळाचे फूल सूर्याच्या तेजाने हसेल.

द्वैरेफाच्या खजिन्यात तो विचार करतो. अरेरे, अरेरे, हत्तीने कमळ वाढवले.

‘रात्र संपेल, लवकरच सुंदर सकाळ होईल. सूर्य उगवेल, कमळ हसेल’ असा विचार करत भ्रमर कमळात  बसला असताना…अरेरे! तोवर हत्तीने ते कमळच उपटून टाकले. अन्योक्तीचा भाव असा आहे की उद्याच्या भरवशावर निर्धास्तपणे विसंबू नका. येथे भ्रमर म्हणजे स्वप्नात रमणारा, निष्क्रिय मनुष्य,  जो फक्त उज्ज्वल भविष्याची कल्पना करत बसतो. ‘उद्या सगळं ठीक होईल.’ या आशेवर जगतो. पण तोवर काळरूप हत्ती म्हणजे कठोर वास्तव येते आणि त्याच्या आशा-स्वप्नांचेच मूळ उपटून टाकते. म्हणजेच फक्त उद्याची वाट पाहत राहणे धोकादायक आहे. आज योग्य कृती केली नाही, तर भविष्याची संधी आपल्या नकळत नष्ट होऊन जाते.

Comments are closed.