एआयमुळे रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील, मोदींचे एआय समिटमध्ये प्रतिपादन
![narendra modi ai paris](https://marathi.tezzbuzz.com/wp-content/uploads/2025/02/narendra-modi-ai-paris-696x447.jpg)
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या फ्रान्स दौऱ्यावर असून त्यांनी राजधानी पॅरिस येथे एआय समिटमध्ये उपस्थितांना संबोधित केले. आज एआय ही काळाची गरज बनली आहे. लोकांचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही व्यवस्था तयार केली आहे. एआयमुळे अनेकांचे आयुष्य बदलणार असून काळानुसार रोजगाराचे स्वरूपही बदलत आहे. एआयमुळे रोजगाराचे संकट निर्माण होऊ शकते असे बोलले जाते, पण कुठलेही तंत्रज्ञान नोकऱ्या घेत नाही हे इतिहास आपल्याला सांगतो. याउलट एआयमुळे नोकरीच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत, असे मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटले.
पॅरिसमधील एआय Action क्शन समिट हे जागतिक नेते, धोरण निर्माते, विचारवंत, नवकल्पना आणि तरुणांना एआयच्या आसपास अर्थपूर्ण संभाषणे एकत्र आणण्याचा एक कौतुकास्पद प्रयत्न आहे. pic.twitter.com/ksxy0fhuit
– नरेंद्र मोदी (@narendramodi) 11 फेब्रुवारी, 2025
एआयचे भविष्य खूप चांगले असून यामुळे सगळय़ांचेच हित साधले जाईल. आमचे सरकार खासगी सेक्टर्सच्या मदतीने पुढे वाटचाल करत आहे. समाज, अर्थव्यवस्था आणि सुरक्षा या आघाडय़ांना एआय सकारात्मक पद्धतीने बदलत आहे. एआयबाबत काही जोखीमीचे मुद्दे जरूर आहेत. त्यावर सखोल चर्चा झाली पाहिजे. एआयचा विकास वेगाने होतो आहे. डेटा गोपनीयता हा त्यातील खूप महत्त्वाचा घटक आहे, असेही मोदी म्हणाले.
Comments are closed.