२९ तारखेला दिल्लीत कृत्रिम पावसाची शक्यता

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात येत्या 29 ऑक्टोबरला कृत्रिम पाऊस पाडला जाण्याची शक्यता आहे. दिल्लीत सध्या वायू प्रदूषणाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी आपल्या शेतांमधील गवत जाळण्यास प्रारंभ केल्याने त्याचा धूर थेट दिल्लीत येत आहे. त्यामुळे दिल्लीतील वायू प्रदूषणात धोकादायक पद्धतीने वाढ होत असून प्रशासनाने प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक उपाय योजना केल्या आहेत. कृत्रिम पाऊस पाडवून हवा स्वच्छ कारणे हा एक उपाय प्रभावी मानला जातो. त्यामुळे तो करुन पाहिला जाणार आहे. तथापि, असा पाऊस पाडण्यासाठी आकाशात मोठे ढग असणे आवश्यक आहे. ते असल्यास त्यांच्यावर विमानांमधून विशिष्ट रासायनिक द्रव्यांचा मारा करुन कृत्रिम पाऊस पाडला जातो. मात्र, प्रत्येक वेळी हा प्रयोग यशस्वी होतोच असे नाही. तरीही हा प्रयोग करुन पाहिला जाईल, असे दिल्ली प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Comments are closed.