एआयमुळे आर्ट्सच्या पदवीधरांनाही मिळणार संधी, कॉग्निझंटच्या सीईओ यांचे मोठे विधान

सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआयमुळे नोकऱ्यांमध्ये उलथापालथ झाली आहे. यामुळे कंपन्यांतील वर्कफोर्समध्ये मोठे बदल पाहायला मिळत आहेत. प्रसिद्ध आयटी कन्सल्टिंग फर्म कॉग्निझंटचे सीईओ रवी कुमार एस यांनी नव्या भरतीसंबंधी एक महत्त्वाचे विधान केले आहे. नोकरभरती करताना केवळ सायन्सच्या विद्यार्थ्यांना नव्हे तर एआयमुळे आर्टस्मधील पदवीधरांनाही नोकरी मिळेल. परंतु त्यांना एआय चांगल्या प्रकारे यायला हवे, असे ते म्हणाले. 3 लाख 50 हजार कर्मचारी असलेल्या आयटी कन्सल्टिंग फर्मचे सीईओ आता नॉन स्टिम पदवीधर म्हणजेच विज्ञान, अभियांत्रिकी, गणित या विषयाची पार्श्वभूमी नसलेल्या पदवीधरांनाही नोकरीची संधी देत आहेत. यात मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ आणि पत्रकार यांचा समावेश आहे. एआयमुळे प्रत्येकाचे काwशल्य वेगवेगळे अधोरेखित होत आहे. यामुळे स्पेशलायझेशनचे महत्त्व कमी होत आहे. बुद्धिमत्तेत असमानता राहिली नाही. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांना एकत्र करणाऱया काwशल्यांवर लक्ष पेंद्रित करण्यास सांगितले आहे. बायोलॉजीचे विद्यार्थी एआयचा वापर करून ड्रग डेव्हलपमेंट सायकल्सचा शोध घेत असल्याचे उदाहरणदेखील आहे, असे ते म्हणाले.

Comments are closed.