शासन भिकारी तर, त्यांच्या नेत्यांकडे 50-50 कोटी येतात कुठून? कोकाटेंच्या वक्तव्यावर अरविंद सावंत यांचा सवाल

माणिकराव कोकाटे आज खूपच पुढे गेलेत. राज्य शासन भिकारी आहे, हे ते म्हणालेत. मग त्यांच्या नेत्यांकडे 50 – 50 कोटी कुठून येतात? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी उपस्थित केला आहे.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी काही महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांच्या पिकविम्याबाबत बोलताना एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावर स्पष्टीकरण करताना कोकाटे आज म्हणाले की, “शेतकऱ्यांकडून शासन एक रुपया घेतं. सरकार शेतकऱ्यांना एक रुपया देत नाही. म्हणजे भिकारी कोण आहे? शासन भिकारी आहे, शेतकरी नाही.” यावरच बोलताना अरविंद सावंत यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
माध्यमांशी संवाद साधताना अरविंद सावंत म्हणाले की, “भिकाऱ्यांच्या नेत्यांकडे पैसे कुठून आले? हे कळालं पाहिजे.” ते म्हणाले, कोकाटे यांनी वारंवार शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. आम्ही तुम्हाला कर्ज देतो, त्या कर्जात तुम्ही मुलींची लग्न करता, असं कोकाटे म्हणाले होते. अशी माणसे त्या पदावर (कृषिमंत्रिपदावर) बसणं योग्य नाही”, असं ते म्हणाले आहेत.
Comments are closed.