सत्ता हाच यांचा देव आणि सत्तेसाठी काहीही करणे हाच यांचा धर्म आहे, अरविंद सावंत यांची भाजपवर सडकून टीका

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

केंद्रातील मोदी सरकारचा महिला आरक्षणाच्या आडून मतदारसंघ पुनर्रचना करण्याचा डाव विरोधकांनी लोकसभेत हाणून पाडला. त्यावरून सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर आरोप केले जात आहेत. विरोधकांकडून कायम हे स्पष्ट करण्यात आले होते की विरोध हा महिला आरक्षणाला नसून त्या आड मोदी सरकारच्या मतदारसंघ पुनर्रचनेच्या छुप्या मनसुब्याला आहे. तसेच विरोधकांनी एकमताने २०२३ साली महिला आरक्षणाचा कायदा एकमताने मंजूर करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना पाठिंबा दिला होता. तरिही मोदी सरकारकडून विरोधकांवर आरोप आहेत.

मोदी सरकारच्या आरोपांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार अरविंद सावंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे 2023 चे एक ट्विट शेअर केले आहे. त्या ट्विटमध्ये महिला आरक्षणाच्या विधेयकाला बहुमताने मंजूरी दिल्याचे म्हटले होते. ते ट्विट शेअर करत सावंत यांनी फडणवीसांवर जोरदार टीका केली. ”फक्त खालची तारीख आणि वर्ष बघा, कालची नौटंकी आपोआप समजेल! आता कळले का? महिला आरक्षणाचा कायदा केव्हा पास झाला तो! आणि तेव्हाही एवढी मते कोणाची मिळाली होती? भाजपची होती का? आम्ही सर्व विरोधी पक्षाच्या सदस्यांनी एकमताने तो कायदा पास केला आणि त्याचे अभिनंदन दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही, तर आपले प्रिय “देवाभाऊ” यांनी त्याच वेळी केले होते. अंधभक्तांना पुरावा मिळावा म्हणूनच ही पोस्ट शेअर केली आहे.सत्य समोर असूनही अंधभक्त आपली टिमकी वाजवतच असतात. यांचे देशाचे वाटोळे करण्याचे राजकारण समजून घ्या. बलात्कारी, भ्रष्टाचारी, दुराचारी किंवा भोंदू बाबांचे समर्थक… कोणीही भाजपमध्ये या, तुम्हाला “शुद्ध” करून सत्तेवर बसवणे हाच यांचा धंदा आहे! दोन उद्योगपतींना विकला गेलेला हा पक्ष देश लुटत आहे. सत्ता हाच यांचा देव आणि सत्तेसाठी काहीही करणे हाच यांचा धर्म आहे”, असे सावंत यांनी ट्विटरवर पोस्ट केले आहे.

Comments are closed.