वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरच्या फलंदाजीत झळकला वडिलांचा अंदाज; DPL पदार्पणात केली धमाल
22 यार्डच्या पट्टीवर सेहवाग या नावाने पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकली आहेत. 2015 मध्ये वीरेंद्र सेहवागने क्रिकेटला अलविदा केल्यानंतर चाहते या नावाला मिस करत होते. मात्र, आता त्याचा मोठा मुलगा आर्यवीर सेहवाग चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. बुधवारी (27 ऑगस्ट) रात्री त्याने दिल्ली प्रीमियर लीग (DPL) मध्ये पदार्पण केले आणि पहिल्याच सामन्यात प्रभावी खेळ दाखवला.
पित्याप्रमाणेच आर्यवीरनेही डावाची सुरुवात केली. पहिला धाव घेण्यासाठी त्याला चार चेंडू खेळावे लागले. त्यानंतर तिसऱ्या षटकात नवदीप सैनीच्या पहिल्या दोन चेंडूंवर सलग दोन चौकार ठोकून चाहत्यांना रोमांचित केले. पहिल्या चौकारासाठी त्याने ओव्हरपिच चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून उडवला, तर दुसऱ्या चेंडूवर पायांचा वापर करून एक्स्ट्रा कव्हर आणि लॉन्ग-ऑफच्या मधून अप्रतिम फटका खेळला.
अभिजात फलंदाजी! एरियाविर सेहवागने सलग चौकार फोडला. 💥 🏏
एराविर सेहवाग | पूर्व दिल्ली चालक | मध्य दिल्ली किंग्ज | अनुज रावत | जॉन्टी सिद्धू | #डीपीएल 2025 #डीपीपी #Adanidpl2025 #डेलही pic.twitter.com/08kwyxqpek
– दिल्ली प्रीमियर लीग टी 20 (@डेलिपल्ट 20) 27 ऑगस्ट, 2025
यानंतर रौनक वाघेलाच्या षटकातही त्याने पहिल्याच दोन चेंडूंवर चौकार काढले, पण अखेरीस 22 धावांवर रौनकने त्याला माघारी धाडले. या सामन्यात आर्यवीरला यश धुलच्या जागी संधी मिळाली होती, कारण यश दुलीप ट्रॉफीत सहभागी झाला होता. डीपीएल 2025 च्या लिलावात सेंट्रल दिल्ली किंग्सने आर्यवीरसाठी तब्बल 8 लाखांची बोली लावली होती.
गेल्या वर्षी त्याने वीनू मांकड ट्रॉफीत दिल्लीसाठी 49 धावा करून विजयात मोठा वाटा उचलला होता. त्यानंतर कूच बिहार ट्रॉफीत त्याने मेघालयविरुद्ध 229 चेंडूत 34 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 200 धावा ठोकल्या होत्या. दुसऱ्याच दिवशी त्याने जवळपास तिहेरी शतक साकारत 309 चेंडूत 51 चौकार व 3 षटकारांच्या जोरावर 297 धावा केल्या, पण फक्त तीन धावांनी तिहेरी शतक हुकले.
Comments are closed.