धोनी बाहेर होताच अश्विनने निवडली सीएसकेची तगडी प्लेइंग 11; कोणाला मिळाली संधी आणि कोण झाले बाहेर?

आयपीएल २०२६ च्या सुरुवातीपूर्वीच चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाला मोठा धक्का बसला आहे. अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनी पायाच्या स्नायूंच्या दुखापतीमुळे (Calf Strain) सुमारे दोन आठवड्यांसाठी स्पर्धेतून बाहेर झाला आहे. माही सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार असल्याने सर्वच चाहते चिंतेत आहेत. आता धोनीच्या अनुपस्थितीत सीएसकेचा संघ कोणत्या खेळाडूंसह मैदानात उतरणार, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. याच प्रश्नाचे उत्तर माजी भारतीय क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन याने दिले आहे. धोनीच्या जागी सीएसकेची ‘प्लेइंग इलेव्हन’ कशी असेल, याचा अंदाज अश्विनने वर्तवला आहे.

​रविचंद्रन अश्विनने ‘इम्पैक्ट प्लेयर’ म्हणून एकूण चार खेळाडूंची निवड केली आहे. यामध्ये अंशुल कंबोज, श्रेयस गोपाल, रामकृष्ण घोष आणि राहुल चहर यांच्या नावांचा समावेश आहे.

​भारतीय दिग्गज अश्विनने प्रशांत वीर याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान न देऊन सर्वांनाच चकित केले आहे. आयपीएल लिलावात चेन्नई फ्रेंचायझीने या युवा अष्टपैलू खेळाडूला १४.२० कोटी रुपयांच्या प्रचंड रकमेत खरेदी केले होते.

​हे वृत्त लिहिपर्यंत, युवा प्रशांत वीरने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ३, लिस्ट-ए मध्ये ८ आणि टी-२० मध्ये ९ सामने खेळले आहेत. त्याच्या फलंदाजीच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, प्रथम श्रेणी क्रिकेटच्या २ डावात ३.५० च्या सरासरीने ७ धावा, लिस्ट-ए च्या ७ डावात ४४.३३ च्या सरासरीने १३३ धावा आणि टी-२० च्या ७ डावात २८.०० च्या सरासरीने ११२ धावा त्याने केल्या आहेत.

​त्याचबरोबर, त्याच्या गोलंदाजीच्या कामगिरीवर नजर टाकली तर, त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटच्या ४ डावात १४.०० च्या सरासरीने २ बळी, लिस्ट-ए च्या ८ डावात ३६.९० च्या सरासरीने १० बळी आणि टी-२० च्या ९ डावात १६.६६ च्या सरासरीने १२ बळी टिपले आहेत.

Comments are closed.