तब्बल 1400 स्पेशल ट्रेन! मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी केले आहे

मध्य रेल्वे | मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने २०२५-२६ या आर्थिक वर्षात प्रवाशांच्या सोयीसाठी मोठी पावले उचलली आहेत. विशेषत: सणासुदीच्या काळात वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर विशेष गाड्या चालवून प्रवाशांना दिलासा दिला. दिवाळी आणि छठ या प्रमुख सणांमध्ये तब्बल 1,109 विशेष गाड्या चालवण्यात आल्या. मागील वर्षीच्या तुलनेत ही संख्या १९७ टक्क्यांनी जास्त आहे. तसेच ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या कालावधीत 40 विशेष गाड्या धावल्या. होळीच्या सणादरम्यान 251 विशेष गाड्या चालवून प्रवाशांची सोय करण्यात आली. रेल्वेच्या या नियोजनामुळे प्रवाशांना आरामदायी प्रवास करता आला.

याशिवाय पुणे विभागाने प्रवास अधिक सोयीस्कर करण्यासाठी पाच नवीन रेल्वे सेवा सुरू केल्या आहेत. आता पुणे थेट जोधपूर, रेवा (वंदे भारत सेवा), अजनी, तिरुपती आणि मुझफ्फरपूर या शहरांशी जोडले गेले आहे. यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी अधिक पर्याय उपलब्ध झाले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे अमळनेर-बीड मार्गावर पहिल्यांदाच पॅसेंजर रेल्वे सेवा सुरू करण्यात आली. ट्रेन क्रमांक ७१४४१/४२ डेमू सेवेचा विस्तार करून ही सुविधा सुरू करण्यात आली. या सेवेचे उद्घाटन 17 सप्टेंबर 2025 रोजी परिसरातील नागरिकांची दीर्घकालीन मागणी पूर्ण करून करण्यात आले. मध्य रेल्वे

सण-उत्सवात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन (मध्य रेल्वे) विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आल्याचे वरिष्ठ विभागीय संचालन व्यवस्थापक डॉ.रामदास भिसे यांनी सांगितले. त्यामुळे प्रतीक्षा यादी कमी होण्यास मदत झाली. प्रवाशांची मागणी, आरक्षणाची स्थिती आणि प्रवासाचा कल यांचा अभ्यास करून गाड्यांचे नियोजन केले जाते. नवीन मार्गांवर सेवा सुरू करण्यामागे विविध भागांतील कनेक्टिव्हिटी वाढवणे आणि प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देणे हा उद्देश असल्याची माहितीही त्यांनी दिली. रेल्वे प्रशासनाने गाड्या वेळेवर धावणे, पुरेशा डब्यांची उपलब्धता आणि गर्दीच्या वेळी सर्व यंत्रणा सुरळीत चालणे यावर विशेष भर दिला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments are closed.